Next
अंजुरफाटा येथे सडक सुरक्षा शिबिर
BOI
Friday, August 10, 2018 | 11:24 AM
15 0 0
Share this article:

भिवंडी : संभव फाउंडेशनच्या सहकार्याने येथील अंजुरफाटा जिल्हा परिषद शाळेत सडक सुरक्षा शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये सडक सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हे शिबिर घेण्यात आले.

यात पाचवी ते आठवीच्या वर्गातील सुमारे ३५० विद्यार्थी सहभागी झाले. प्रशिक्षक देवेंद्र कांबळे यांनी रस्त्यावर चालताना, सायकल किंवा वाहन चालवताना घ्यायची काळजी, झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावर विविध प्रकारचे दिशादर्शक सूचनाफलक यांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी ट्राफिक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिषेक शिंदे उपस्थित होते.

शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना संभव फाउंडेशनतर्फे सडक सुरक्षा माहितीपुस्तिका व प्रमाणपत्र देण्यात आले. ‘संभव’च्या सहसंयोजिका रोशन रणदिवे यांनी विशेष मेहनत घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता गायकवाड यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शाळेचे सर्व शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक विजयकुमार जाधव यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sunil ONKAR TAYADE About 339 Days ago
From the above program students will always follows the road safety rules. Very nice program.
0
0
Prabhakar Jadhav About 339 Days ago
Really very nice program conducted by N G O with z.p school Anjurfata It's very important for students those are under 14
0
0

Select Language
Share Link
 
Search