Next
धवलगावात सुरू झाले बीपीओ कॉल सेंटर
‘ओपस’चे ग्रामीण भागात दुसरे बीपीओ;तीनशेजणांना रोजगार
BOI
Tuesday, September 04, 2018 | 03:44 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बीपीओ कॉल सेंटर(बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग), केपीओ ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगार केंद्रे आता शहरी भागापुरती मर्यादित राहिली नसून, ग्रामीण भागातही त्यांचा विस्तार होत आहे. त्यामुळे येथील युवकांना आपल्या गावातच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या मिळत आहेत. नुकतेच ‘ओपस रुरल फाउंडेशन’ने (ओआरएफ) पुण्यापासून साधारण ऐंशी किलोमीटर अंतरावर, अहमदनगर जिल्ह्यातील धवलगाव येथे आपले दुसरे बीपीओ केंद्र सुरू केले असून, सुरूवातीला तीनशेजणांना नोकऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

‘या बीपीओमुळे आसपासच्या गावांतील युवांनाही रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या  कुटुंबांसोबत राहून नोकरी करता येईल. चार एकर परिसरात हे बीपीओ सेंटर असून, यासाठी ‘ओपस’ने दहा लाख डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भविष्यात ती आणखी वाढवण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत, हा उपक्रम ग्रामीण भारतातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देत डिजिटल विकासात वाढ साधणार आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही धवलगावमधील या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. याचबरोबर हे सेंटर पीक विज्ञान हेल्पलाईन म्हणूनदेखील सेवा देईल. येथे शेतकऱ्यांसाठी उत्तम लायब्ररीचीदेखील उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील प्राथमिक शाळांच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यामध्ये कंपनी मदत करत आहे’, अशी माहिती ‘ओपस’चे कार्यकारी अध्यक्ष रमेश मेंगावडे यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले, ‘तरुणांना त्यांच्या गावाच्या ठिकाणीच उत्पन्नाच्या इतर संधी प्रदान करण्याबरोबरच ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतीतून उत्पन्न वाढवणे महत्वाचे आहे. या उपक्रमाचे मुख्य ध्ये‍य, लहान गावे व अधिक दुर्गम गावांतील स्थानिक युवांकरिता रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आणि त्यांच्या सर्वांगीण वाढ व विकासामध्ये मदत करण्याचे आहे. त्याशिवाय, ओपस रुरल फाउंडेशन कौशल्य विकास व स्वयं-रोजगार संधी पुरवण्या‍द्वारे निवडक गावांमध्ये भरीव कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता आम्ही ग्रामपंचायतींसोबत कार्यरत आहोत.’

‘‘ओआरएफ’चे पहिले बीपीओ केंद्र २०११मध्ये उभारण्यात आले. तेव्हापासून येथे पाचशेहून अधिक युवांना रोजगार मिळाला आहे. ‘ओपस’चे रिटेल व पेमेंट्स तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्सकीरिता पुण्यात एक इन्क्यूबेशन सेंटर असून, कंपनीने या क्षेत्रात पाच उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली आहे’, असेही मेंगावडे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search