Next
निवडक र. अ. नेलेकर
BOI
Monday, July 02, 2018 | 12:49 PM
15 0 0
Share this article:

भयकथा किंवा गूढकथा म्हणजे अंधार, काळोख, रात्र, पदकी घरे, रखवालदार, तळघर, मूर्ती, अपुरा प्रकाश असे बरेच काही आठवते आणि त्याहीपेक्षा वाटते ती उत्सुकता आणि भीती. हे सगळे घटक र. अ. नेलेकर यांच्या या भय-गूढकथांमध्ये आढळतात. एकूण १६ कथा या संग्रहात आहेत.

अनाकलनीय, अतर्क्य शोधण्याचा प्रयत्न या कथा करतात. ‘उंच वाढलेलं गवत सळसळत जावं, तशी पोर सटासट खाली आली’, ‘मांडीखाली वळवळणारी सापाची शेपटी दिसल्यासारखा अंता हळहळला,’ ‘संभाषण सुरू असताना मनातल्या शंकांची शेपटं वळवळायची थांबत होती,’ अशी वाक्ये नेलेकर चित्रमय शैलीची ओळख करून देतात. त्यांच्या कथांच्या विषयांमध्येही वैविध्य आहे. वर्णनांएवढेच संवादही प्रभावीपाने समोर येतात. मानसशास्त्राचा वापर केलेला दिसतो. कथा जशा भीती निर्माण करतात, तशाच रंजकही आहेत.

प्रकाशक :
राजेंद्र प्रकाशन
पाने : २६८  
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search