Next
‘विठूमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपतीबाप्पा
प्रेस रिलीज
Thursday, September 13, 2018 | 11:15 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘विठूमाऊली’ या मालिकेत लवकरच गणपतीबाप्पा अवतरणार आहेत. पुंडलिकाच्या मातृभक्तीचा महिमा त्रिलोकात गाजत आहे. पुंडलिकाची आईवर असणारी श्रद्धा आणि प्रेम कितपत खरे आहे हेच तपासून पाहण्यासाठी गणपतीबाप्पांचे आगमन होणार आहे.

‘विठूमाऊली’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाह’वर दाखविली जाते. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असल्याने ‘विठुमाऊली’ मालिकेतही लवकरच गणेशपर्व सुरू होणार आहे. या पर्वामध्ये गणपतीबाप्पा पुंडलिकाची परीक्षा घेणार आहेत. यात बाप्पाच्या आवडीच्या गोष्टी पुंडलिकाला करून दाखवायच्या आहेत. यातील पहिले कार्य असेल ते म्हणजे गणपती बाप्पाने दिलेल्या मोजक्या तांदळापासून पुंडलिकाला २१ मोदक बनवायचे आहेत आणि तेही कुणाचीही मदत न घेता.

बाप्पाने दिलेले हे कार्य पुंडलिक पार पाडेल का, विठूराया पुंडलिकाचे साहाय्य करेल का, कलीच्या कारस्थानांमुळे पुंडलिकाच्या मेहनतीवर पाणी पडणार का, या साऱ्याचा उलगडा विठूमाऊलीच्या पुढील काही भागांमध्ये होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search