Next
ईश्वर संकल्पना नि आयुर्वेद
BOI
Wednesday, October 03, 2018 | 10:14 AM
15 0 0
Share this article:

कोणत्याही वस्तूची हालचाल होण्यामागे ऊर्जेची किंवा शक्तीची गरज असते. आपणास ऊर्जा देणारे पदार्थ, वस्तू यांना ऊर्जा कोठून मिळते, याचे उत्तर सृष्टी असे देताना सृष्टी म्हणजे काय, हे डॉ. एस. एस. गवळी यांनी ‘ईश्वर संकल्पना नि आयुर्वेद’ या पुस्तकातून समजावून दिले आहे.

ईश्वर व आयुर्वेद या संकल्पना स्पष्ट करताना ‘जडवाद’ आणि ‘चैतन्यवाद’ या दोन विचारधारांची ओळख करून दिली आहे. ईश्वर म्हणजे काय याचे उत्तर शोधताना लेखकाने आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेला आणि शास्त्राधार असलेल्या सृष्टीची निर्मिती व तिचा क्रम सांगितला आहे. देवाला एकाच रूप व नाव का नाही? या प्रश्नावर चर्चा करताना आधुनिक विज्ञान व भारतीय तत्त्वज्ञानाने सांगितलेली विश्वनिर्मिती यातील साम्य दाखविले आहे. ईश्वर संकल्पनेच्या युक्तिवादाचे खंडन-मंडन, हिंदू धर्मातील दोन पंथ, पुनर्जन्म, दु:ख, स्वार्थ, मोक्ष, गुरू परंपरा, इच्छामरणास आयुर्वेदाचा शास्त्राधार आदी अनेक प्रकरणांमधून भारतीय दर्शनशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र यातील माहिती वाचकांपर्यंत पोचविली आहे.

प्रकाशक : गोकुळ प्रकाशन
पाने : १५२
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search