Next
‘सचिन ओपन्स अगेन’ : या ‘वर्ल्ड कप’मध्ये करणार कॉमेंटरीच्या इनिंगची सुरुवात
BOI
Thursday, May 30, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this article:

लंडन : विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याने ‘ओपनिंग बॅट्समन’ म्हणून अनेक मॅचेस गाजविल्या आणि विक्रमांचे डोंगर उभे केले. आता तो निवृत्त झाला असला, तरी आजपासून (३० मे २०१९) इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो नवी इनिंग सुरू करणार आहे, ती म्हणजे कॉमेंटरीची. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ओव्हल मैदानावर होणाऱ्या सामन्यावेळी सचिन कॉमेंटरी बॉक्समध्ये उपस्थित असेल. 

सामन्याआधी होणाऱ्या कार्यक्रमात सचिनचा सहभाग असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून, तो हिंदी आणि इंग्रजीत असेल. ‘सचिन ओपन्स अगेन’ असे त्याच्या कार्यक्रमाचे नाव आहे. त्याच्यासोबत अनेक तज्ज्ञांचे पॅनेलही असेल. त्यातील काही जण सचिनसोबत खेळलेलेही आहेत. 

सचिनचे काही विक्रम...
सचिन सहा वर्ल्ड कप स्पर्धांत खेळला असून, त्यात त्याने एकूण २२७८ धावा केल्या आहेत. २००३च्या ‘वर्ल्ड कप’मध्ये ११ सामन्यांत ६७३ धावा करण्याचा विक्रम त्याने केला आहे. १९८९मध्ये वयाच्या १६व्या वर्षी कारकीर्द सुरू केलेल्या सचिनने २०१३मध्ये निवृत्ती घेतली. २४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. ५१ (कसोटी) आणि ४९ (एकदिवसीय) अशी एकूण १०० शतके त्याच्या नावावर आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो पहिला खेळाडू.

हेही जरूर वाचा :

सचिनसोबत विराटचाही मेणाचा पुतळा; ‘वर्ल्ड कप’च्या पूर्वसंध्येला ‘लॉर्डस्’वर अनावरण
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Prapurika joshi About 108 Days ago
Great, we all are happy to see as a comentator sachin tendulkar, ..!!👌
0
0

Select Language
Share Link
 
Search