Next
‘ग्रंथालयांचे महत्त्व वाढविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे’
डॉ. राम ताकवले यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, December 01, 2018 | 03:41 PM
15 0 0
Share this article:

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नॅक मूल्यांकन मिळविण्यासाठी ग्रंथालयांची तयारी या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. राम ताकवले,   डॉ. प्रफुल्ल पवार, विश्वेश कुलकर्णी, डॉ. मिलिंद मराठे, डॉ. राजेंद्र सबनीस आदी मान्यवर.

पुणे : ‘महाविद्यालयीन शिक्षणप्रणालीमध्ये प्राध्यापकांद्वारे केल्या जाणाऱ्या अध्यापनासोबत ग्रंथालयाचे महत्त्व अन्यन्नसाधारण आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी ग्रंथालयाचे योगदानही महत्वाचे असते’, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व नॅकचे माजी अध्य‍क्ष डॉ. राम ताकवले यांनी व्यक्त  केले.

ते पुण्या्त यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ‘नॅक मूल्यांकन मिळविण्यासाठी ग्रंथालयांची तयारी’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते. या कार्यशाळेसाठी संपूर्ण राज्यातून दोनशेहून अधिक ग्रंथपाल व साहाय्यक ग्रंथपाल उपस्थित होते.
 
ते पुढे म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) डिजिटल मीडिया, इंटरनेट अशा गोष्टींचा प्रभाव वाढणाऱ्या सध्याच्या काळात अध्यापन शैलीप्रमाणे ग्रंथालयांनीही कार्यपद्धतीमध्ये कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. ग्रंथालयातील ज्ञानभांडार विद्यार्थ्यांच्या ज्ञानाजर्नात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत ग्रंथपालांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, ग्रंथपालांनीही आपल्याच कामकाजात अधिका‍अधिक विद्यार्थीभिमुखता आणण्या‍साठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे. नॅक मूल्यांकनामध्ये ग्रंथालयाच्या कामकाजाचे निकष आवश्यक करण्यात आल्याने ग्रंथालयाचा दर्जा आणि महत्त्व वाढण्यास मदत होईल.’


या वेळी बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ‘नॅक मूल्यांकनासंदर्भात ग्रंथपालांची अशा प्रकारची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल ‘यशस्वी’ संस्थेचे विशेष आभार. ग्रंथपालांनाही अन्य शैक्षणिक कर्मचाऱ्यांप्रमाणेच आदर द्यायला हवा. एकीकडे आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षणप्रणालीकडे वाटचाल करीत असताना ग्रंथालयांचा चेहरा मोहराही आनंददायी ठरायला हवा. निराशाग्रस्त शांततेऐवजी उत्साही वातावरणनिर्मिती तयार करण्यासाठी ग्रंथपालांनी पुढाकार घ्यायला हवा. ग्रंथालय हा सातत्याने वृद्धिंगत होत जाणारा घटक असल्याने तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्यासाठी ग्रंथपालांसोबतच संस्थाचालकांनीही पुढे यायला हवे.’ 

या कार्यशाळेत डॉ. चंद्रकांत रावळ, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. विजय कांची, डॉ. स्वाती बर्नाबस, ऋषाली दंडवते, सुधीर येवला, डॉ. भाऊसाहेब पांगे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आयआयएमएसचे संचालक डॉ. मिलिंद मराठे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन यशस्वी एज्यु्केशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी केले. या राज्यस्त‍रीय कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून पवन शर्मा यांनी काम पाहिले. या कार्यशाळेसाठी आदिती चिपळूणकर, प्रा. सारंग दाणी, प्रा. अमर गुप्ता आदींनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search