Next
येस बँकेची पँटोमॅथसह भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, December 14, 2017 | 05:21 PM
15 0 0
Share this story

मुंबई : येस बँक या भारताच्या खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वात मोठ्या बँकेने, पँटोमॅथ अॅडव्हायजरीबरोबर भागीदारी केली आहे. पँटोमॅथ हा एक सल्लागार सेवा देणारा समूह  असून, एमएसएमईसाठी व्यापारी बँकर म्हणूनही कार्यरत आहे, महाराष्ट्र आणि गुजरात यावर एमएसएमई अर्थयंत्रणेचा विकास करण्यासाठी या कंपन्या लक्ष केंद्रीत करणार आहेत.

येस बँकेच्या व्यवसाय व ग्रामीण बँक सेवांचे समूह अध्यक्ष आणि नॅशनल प्रमुख सुमित गुप्ता म्हणाले, ‘आपल्या देशाची भविष्यातील प्रगती आणि नोकरीच्या संधी या प्रामुख्याने एमएसएमई क्षेत्रावर आणि स्टार्ट-अप कम्युनिटीवर अवलंबून आहेत. एमएसएमई क्षेत्र म्हणजे भारतीय अर्थयंत्रणेचा कणा आहे, असा येस बँकेचा विश्वास आहे, यामुळेच एमएसएमई क्षेत्रासाठी एकाच ठिकाणी सर्व उपाययोजना देणारी पुरवठादार बँक बनणे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.सध्या भारतात अंदाजे ४८ दशलक्ष इतके एमएसएमई आहेत, यात भारतातील औद्योगिक आउटपुट ४५ टक्के, देशाची एकूण निर्यात ४० टक्के इतकी आहे आणि नोकरीच्या निर्मितीची क्षमता विलक्षण आहे. पँटोमॅथसह सुयोग्य वेळेत भागीदारी करण्यात आलेली आहे आणि एमएसएमई अर्थयंत्रणेच्या उभारणीत एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहेत.

पँटोमॅथ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुनावत म्हणाले, ‘पँटोमॅथद्वारे एमएसएमई क्षेत्रातील मार्केटच्या विकासासाठी असंख्य उपक्रम राबवण्यात आले आहे. येस बँकेबरोबर संलग्नितपणे काम करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या भागीदारीतून आम्ही महाराष्ट्र राज्यातील एमएसएमई अर्थयंत्रणेचा विकास करणार आहोत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link