Next
केशायुर्वेद
BOI
Saturday, May 11, 2019 | 10:14 AM
15 0 0
Share this article:

केस हा आपल्या शरीराचा अविभाज्य; पण दुर्लक्षित भाग समजला असे. हल्ली सौंदर्यशास्त्र चिकित्सेनुसार केसांचे सौंदर्य राखण्यासाठी लक्ष दिले जाते. वैद्य हरीश पाटणकर यांनी यावर आयुर्वेदाच्या दृष्टीने केसांवर सुंदर व सुरक्षित चिकित्सापद्धती तयार केली असून, त्याची माहिती ‘केशायुर्वेद’मधून दिली आहे. 

उत्पत्ती स्थिती व लय हा सृष्टीचा नियम केसांना कशा पद्धतीने लागू पडतो, हे सांगत केश त्रिदोष विचार समजून दिले आहे. केश व सप्तधातू संबंध, केश व त्रिमल विचार, केश व पंचमहाभूत विचार, केश षडरस संबंध, आहाराचा कमी-अधिक, चांगला-वाईट परिणाम आदी माहिती दिली आहे. कोंडा होणे, चाई पडणे, केस गळणे, केस पिकणे, केश दुभंगणे, खडवे पडणे, उवा होणे आदी केसांसंदर्भातील समस्यांची कारणे व त्यावरील आयुर्वेदीय उपाय सांगितले आहेत. अनावश्यक केस, आधुनिक सौंदर्य उपचारांचा केसांवरील परिणाम, केशवृद्धी उपचार, केसांचे पथ्यापथ्य आदींवरही मार्गदर्शन केले आहे.    
     
पुस्तक : केशायुर्वेद
लेखक : वैद्य हरिश पाटणकर
प्रकाशक : पद्मज प्रकाशन
पाने : ९६
किंमत : १६० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search