Next
शिवसेना सत्तेत असल्याने अविश्‍वास ठराव मांडणे अशक्‍य
प्रभात
Monday, February 27, 2017 | 01:37 PM
15 0 0
Share this article:



कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी दिले स्पष्टीकरण


पुणे: राज्यातल्या पालिका निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागल्याचे दिसत आहे. कारण सत्ता स्थापणेसाठी योग्य ती समिकरणे सेना किंवा भाजप यांच्याकडून बसत नसल्याचे दिसत आहे. त्यातच शिवसेना बरोबर आल्याशिवाय फडणवीस सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणे शक्‍य नाही. त्यामुळे याबाबत काय ते शिवसेनेने ठरवावे. पण मला वाटते की, शिवसेना धक्का मारुन बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही. अशा शब्दात कॉंग्रेस नेते नारायण राणेंनी शिवसेनेवर बोचरी टीका केली.एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सेनेवर ही टीका केली.

येत्या अधिवेशनात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस फडणवीस सरकारवर अविश्वास ठराव आणणार असल्याची चर्चाही सुरु आहे. त्याबाबत राणे यांनी स्पष्टीकरण दिले. शिवसेना बरोबर आल्याशिवाय अविश्वास ठराव मांडणे शक्‍य नाही. त्यामुळे याबाबत काय ते शिवसेनेने ठरवावे. पण मला वाटतं की, शिवसेना धक्का मारुन बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही. असे राणे म्हणाले. दुसरीकडे राणेंनी भाजपवरही निशाणा साधला. पराभव हा पराभव असतो त्यासाठी कारणे सांगू नयेत. पण भाजपने या निवडणुका प्रामाणिकपणे जिंकलेल्या नाहीत. असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे. भाजपाच्या विजयावर ज्या काही शंका घेतल्या जात आहेत त्यात काहीतरी तथ्य असणारच. अशी शंकाही राणेंनी व्यक्त केली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यभरात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर सुरुवातीला निवडणुकीतील निकालांविषयी सोशल मीडियातून भाजपवर आरोप करण्यात येत होते. मात्र, आता कॉंग्रेस नेते राणेंनीही या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search