Next
शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, सिनेमासाठी नवे दालन - फिमोटिमो
जगभरातील फिल्म पाहण्यासाठी आणि स्वतःच्या फिल्म जगभर पोहोचवण्यासाठी ‘मायविश्व कॉर्पोरेशन’तर्फे नवे व्यासपीठ
BOI
Tuesday, May 07, 2019 | 02:02 PM
15 0 0
Share this article:

‘फिमोटिमो’चे होमपेज

पुणे :
जगभरातील विविध भाषांतील फीचर फिल्म, डॉक्युमेंटरी, सिनेमा, वेबसीरिज, नाटके आदींचे व्हिडिओ पाहण्यासाठी अमेरिकास्थित मायविश्व कॉर्पोरेशनतर्फे फिमोटिमो ही नवी वेबसाइट अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली आहे. तसेच, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, सिनेमासह विविध प्रकारचा व्हिडिओ कंटेंट तयार करणाऱ्यांना स्वतःचे व्हिडिओही येथे उपलब्ध करून त्याचा मोबदला मिळवता येणार आहे. त्यामुळे निर्माते/दिग्दर्शक/लेखक आणि प्रेक्षक या दोघांसाठीही ‘फिमोटिमो’ हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 

https://www.fimotimo.com/ या वेबसाइटवर स्वतःचे अकाउंट तयार करून विविध व्हिडिओ प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. अकाउंट तयार करण्यासाठी काहीही शुल्क नसून, केवळ आपल्याला जो व्हिडिओ पाहायचा आहे, त्यासाठीच पैसे मोजावे लागणार आहेत. आपण खरेदी केलेला व्हिडिओ आयपॅड, मोबाइल, लॅपटॉप, कम्प्युटर, टीव्ही, होम थिएटर यांपैकी कोणत्याही माध्यमातून पाहता येणार आहे. त्यामुळे जगभरात कुठेही आणि केव्हाही हे व्हिडिओ पाहणे शक्य होणार आहे. ‘कासव’ आणि ‘आनंदी गोपाळ’ हे मराठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले दोन दर्जेदार सिनेमे ‘फिमोटिमो’वर उपलब्ध झाले आहेत. असेच नवनवे आणि उत्तमोत्तम सिनेमे आणि विविध भाषांतील व्हिडिओ या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत. 

ज्यांना आपण स्वतः तयार केलेले व्हिडिओ (म्हणजेच फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, सिनेमा इत्यादी) ‘फिमोटिमो’वर विक्रीसाठी उपलब्ध करायचे आहेत, त्यांना त्यासाठी कोणतेही व्यवस्थापन शुल्क आकारले जात नाही. वेबसाइटवर अकाउंट सुरू करून त्यांना स्वतःचे व्हिडिओ त्यावर अपलोड करता येतात. त्यांनी ठरवलेल्या किमतीला ते व्हिडिओ ग्राहकांना पाहण्यासाठी उपलब्ध केले जातात. ग्राहकांनी ते खरेदी केल्यावर त्यातील काही टक्के रक्कम कमिशन म्हणून ‘फिमोटिमो’कडे वळती करून उर्वरित रक्कम संबंधित व्हिडिओच्या निर्मात्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत संपूर्ण पारदर्शकता असून, प्रत्येक ‘व्ह्यू’ची माहिती व्हिडिओच्या निर्मात्याला मिळणार आहे. 

‘फिमोटिमो’वर अपलोड केलेल्या व्हिडिओचे सर्व हक्क ज्याचे त्याच्याकडेच अबाधित राहतात. हे व्हिडिओ केवळ पाहण्यापुरते ‘फिमोटिमो’वर उपलब्ध केले जात असल्याने ‘फिमोटिमो’कडे त्याचे कोणतेही हक्क नसतात. 

यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही, की अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असल्यामुळे ‘फिमोटिमो’वरील व्हिडिओची पायरसी करणे शक्य नाही. तसेच, कुणीही यावरील एखाद्या व्हिडिओची लिंक शेअर केली, तरी तो व्हिडिओ खरेदी केल्याशिवाय कोणालाही पाहता येत नाही. संबंधित व्हिडिओ जगभर किंवा कोणत्या विशिष्ट देशांत उपलब्ध करायचा असेल, तर ते निवडण्याची सुविधाही निर्मात्यांना आहे. 

मायविश्व कॉर्पोरेशन ही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असून, अमेरिकेत तिचे मुख्यालय आहे. तसेच ऑस्ट्रेलियात आणि भारतातही पुणे, रत्नागिरी येथे कंपनीची कार्यालये आहेत. ‘मायविश्व’ने सुरू केलेली ‘बुकगंगा डॉट कॉम’ ही वेबसाइट जगभर लोकप्रिय झाली असून, या माध्यमातून मराठी पुस्तके जगभर घरपोच पोहोचवली जातात. त्याशिवाय, होम मिनिस्टर, तुमचं आमचं जमलं या झी-मराठीच्या उपक्रमांच्या वेबसाइट्स आणि अॅप्सही ‘मायविश्व’नेच विकसित केली आहेत. त्या व्यतिरिक्त आणखीही वेगवेगळ्या उपयुक्त वेबसाइट्स ‘मायविश्व’ने विकसित केल्या आहेत. आता व्हिडिओसाठी ‘फिमोटिमो’ हे नवे दालन सुरू करताना आनंद होतो आहे, अशा भावना ‘मायविश्व’चे सीईओ मंदार जोगळेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Aparna Gajare About 122 Days ago
छान उपक्रम
0
0
mohan About 131 Days ago
अभिनंदन !
0
0
Amit About 131 Days ago
Congratulations Mandar dada. You did it.😀
0
0

Select Language
Share Link
 
Search