Next
‘निवडणूक खर्चावर बारीक लक्ष ठेवण्‍याची गरज’
निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार चढ्ढा
प्रेस रिलीज
Monday, April 15, 2019 | 03:07 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘लोकसभा निवडणुका शांत, निष्‍पक्ष, मुक्‍त वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक खर्चावर बारीक लक्ष ठेवण्‍याची गरज असून, सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे,’ अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार चढ्ढा यांनी दिल्‍या.

व्‍हीव्‍हीआयपी सर्किट हाउसवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापनचे समन्‍वय अधिकारी अजित रेळेकर, मीडिया सेंटरच्‍या नंदिनी आवडे, राज्‍य उत्‍पादन शुल्‍कचे अधीक्षक तडवी, तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

चढ्ढा यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व भागाचा दौरा केला आहे. प्रचारासाठी होणारा निवडणूक खर्च उमेदवारांकडून सादर होतो, पण प्रत्यक्षात होणारा खर्च आणि सादर होणारा खर्च यात तफावत असण्‍याची शक्‍यता असते. भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक यांनी दक्ष राहून निवडणुकांवर होणारा खर्च लक्षात आणून दिला पाहिजे. मावळ, पिंपरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघातील काही बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्‍याच्‍या सूचना चढ्ढा यांनी दिल्‍या.



पेट्रोल-डिझेल, दारू यांचा गेल्‍या तीन महिन्‍यांतील वापर आणि उलाढालींची माहितीही त्‍यांनी संकलित करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. सोशल मीडिया, पेड न्‍यूजबाबतही आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात यावी, मतदारांना किंवा एकगठ्ठा मतांसाठी प्रयत्‍न करणाऱ्यांना काही उमेदवार टूर पॅकेज देण्‍याची शक्‍यता असते, यावरही लक्ष ठेवण्‍यात यावे, कम्‍युनिटी सेंटर, बँक्‍वेट हॉल, स्‍वयंसहायता बचत गट याबाबतही आवश्‍यक ती माहिती संकलित करण्‍याचे तसेच  ग्रूप एसेमेससाठी टेलिफोन ऑपरेटरिंग कंपन्‍याची बैठक  घेण्‍याची सूचना त्‍यांनी केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search