Next
कास्ट्राइब कर्मचारी महासंघ व कास्ट्राइब शिक्षक संघटनेची कोकण आयुक्तांसोबत चर्चा
मिलिंद जाधव
Wednesday, October 10, 2018 | 12:24 PM
15 0 0
Share this storyनवी मुंबई :
कास्ट्राइब कर्मचारी महासंघ व कास्ट्राइब शिक्षक संघटना यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोकण आयुक्त जगदीश पाटील यांच्यासोबत आठ ऑक्टोबरला नवी मुंबईतील कोकण भवनमध्ये चर्चा केली. 

या वेळी पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र बोरकर, मुंबई शहर तहसीलदार सचिन भालेराव, सिंधुदुर्ग तहसीलदार विजय दांडेकर, कोकण भवन विकास शाखेतील नारायण परदेशी, विकास आस्थापना शाखेतील गणेश गांधळे, सिंधुदुर्ग तहसीलदार (पुनर्वसन) विजय दांडेकर, मागासवर्गीय कक्ष सहायक आयुक्त तुषार मठकर उपस्थित होते. 

१) मार्च २०१८पर्यंतच्या सरळसेवा व पदोन्नतीमधील अनुशेष, निलंबित प्रकरणांचा निपटारा; २) तीन डिसेंबर १९८०च्या ‘जीआर’नुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त्या; ३) ठाणे- पालघर विकल्प समायोजन व इतर समस्यांवर चर्चा; ४) चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नती; ५) १२ वर्षे व २४ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आढावा; ६) ठाणे, पालघर जिल्हा बदलत्या सामाजिक आरक्षणानुसार बिंदूनामावली रोस्टर तपासणी करताना जात पडताळणी व मूळ नियुक्ती आदेश यांची काटेकोर तपासणी करून रोस्टर मंजुरी द्यावी; ७) विकल्प समायोजनात बोगस माहिती सादर करून लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार व त्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी; ८) प्रभारी गटशिक्षणाधिकारी पद विस्ताराधिकारी यांच्याकडे न देता सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडे द्यावे या शासन आदेशाची अंमलबजावणी ठाणे व कोकणातील जिल्ह्यात करा; ९) पोषण आहार योजना ठेकेदारांकडून अपुरा व निकृष्ट पुरवठा होतो याची चौकशी करावी, अशा विविध प्रश्नांवर या वेळी चर्चा करण्यात आली. तीन मार्च २०१८च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कास्ट्राइबसोबत दर तीन महिन्यांनी बैठका घ्या, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले. या वेळी संघटनेचे अतिरिक्त सरचिटणीस सुरेश तांबे, कार्याध्यक्ष रवींद्र पालवे, कोकण अध्यक्ष संतोष गाढे, ठाणे अध्यक्ष विजयकुमार जाधव, पालघर अध्यक्ष हेमंत कोकणे, रायगड अध्यक्ष श्याम मारकड, रत्नागिरी अध्यक्ष डॉ. राठोड, अपंग विभाग सचिव अरविंद सोनावणे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh About 131 Days ago
Good job
0
0
Santosh g About 131 Days ago
Very nice
0
0

Select Language
Share Link