Next
मंदिरांच्या देशा
BOI
Monday, April 08, 2019 | 10:10 AM
15 0 0
Share this article:

पर्यटनासाठी भारतात कोठेही गेला, तरी एक तर त्यात मंदिरांची भेट असतेच. त्यातच महाराष्ट्राचे वर्णन ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे करतानाच ‘मंदिरांच्या देशा’ असेही केले पाहिजे, अशी अपेक्षा ओंकार वर्तले यांनी व्यक्त करीत महाराष्ट्रातील मंदिरांचा परिचय ‘मंदिरांच्या देशा’मधून केले आहे.

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांत फिरताना, गावागावांतून भटकताना अनेक प्राचीन मंदिरे समोर येतात. अशा मंदिरांची माहिती या पुस्तकात दिली आहे. यात पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर, रायरेश्वर, तासुबाई, म्हैसोबा, कुकडेश्वर, पळसदेव, पाच पांडव मंदिर अशा १९ मंदिरांचा समावेश आहे. सातारा, नगर, नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद, ठाणे, रत्नागिरी व जळगाव जिल्ह्यातीलही प्राचीन मंदिरांचा इतिहास व भूगोल यातून वाचायला मिळतो. यात मंदिरांचे सौंदर्य, स्थापत्यशैली, शिल्पकला यांचे वर्णन यात असून, तेथपर्यंत जाण्याचा मार्ग, जवळची पाहण्याची ठिकाणे, राहण्याची व्यवस्था आदी पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाची माहितीही दिली आहे.        

पुस्तक : मंदिरांच्या देशा
लेखक : ओंकार वर्तले
प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १६०
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search