Next
शेअर बाजारात तेजीची चिन्हे
BOI
Sunday, July 22 | 03:45 PM
15 0 0
Share this story

राजकीय स्थैर्य खुंटा हलवून बळकट झाल्याने पुढील सहा महिने बाजारात अनेक शेअर्स वर्षभरातील उच्चांकी भाव गाठतील. गेल्या आठवड्यात अनेक कंपन्यांचे जून तिमाहीचे उत्तम आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात शेअर बाजारात तेजीचे वारे वाहतील. त्याचा लाभ घेण्यासाठी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, याबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
..........
लोकसभेत २० जुलैला विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरुद्ध मांडलेला अविश्वास ठराव नामंजूर झाला. त्यामुळे सोमवारी शेअरबाजारात किंचित सुधारणा दिसावी. शुक्रवारी निफ्टी व सेन्सेक्स अनुक्रमे ११ हजार १० व ३६ हजार ४९६ अंकांवर बंद झाले. राजकीय स्थैर्य  खुंटा हलवून बळकट झाल्याने पुढील सहा महिने शेअर बाजारात अनेक शेअर्स वर्षभरातील उच्चांकी भाव गाठतील. 

भरीला गेल्या आठवड्यात स्टरलाइट टेक्नॉलॉजिज, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज होल्डिंग यांचे जून तिमाहीचे उत्तम आकडे प्रसिद्ध झाले आहेत. बजाज फायनान्सचा या तिमाहीचा नक्त नफा एक हजार १८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या जूनपेक्षा तो ६९ टक्क्यांनी वाढला आहे. जून २०१७ तिमाहीचा नफा ६०२ कोटी रुपये होता. आकडे प्रसिद्ध झाल्यावर शेअरचा भाव दोन हजार ७४६ रुपयांपर्यंत चढला आहे. गेल्या वर्षभरातील किमान भाव एक हजार ५११ रुपये होता. तेव्हापासून त्यात ६० टक्के वाढ झाली आहे. अजूनही या भावाला हा शेअर घेतला तरी फायदाच होईल. कारण तिमाही आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर दर वेळी तो वरच जात असतो. जून २०१८ तिमाहीसाठी कंपनीने आठ हजार ७६७ कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे. या तिमाहीसाठी शेअरगणिक उपार्जन ५१.९ रुपये आहे. जून २०१७ तिमाहीसाठीचे ३६.७ रुपये होते. बजाज फायनान्स ही बजाज फिनसर्व्हची उपकंपनी आहे .

स्टरलाइट टेक्नॉलॉजीचा या तिमाहीचा नफा १२१ कोटी रुपये आहे. ढोबळ नफा २५२ कोटी रुपये होता. तिच्याकडे सहा हजार ३४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. सध्या या शेअरचा भाव सतत वाढत आहे. सध्या तो ३३० रुपये आहे. वर्षभरात तो ४२५ रुपये व्हावा. नुकतेच तिने युरोपमध्ये एका कंपनीचे आग्रहण केले आहे. ऑप्टिकल फायबर केबल्समध्ये ही विंध्य टेलिलिंक्सप्रमाणे अग्रगण्य कंपनी आहे.

गुंतवणुकीसाठी भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम हेही उत्तम शेअर्स आहेत. तेल शुद्धीकरण व विक्री करणाऱ्या या कंपन्या अत्यंत कमी गुणोत्तराला उपलब्ध आहेत. हे दोन्ही शेअर्स वर्षभरात किमान ३५ टक्के वाढावेत.

पंतप्रधानांनी विश्वास ठराव जिंकल्यामुळे आता भाजपला राजस्थान व मध्य प्रदेशमधील विधानसभांच्या निवडणुकीत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचाही फायदा पक्षाला २०१९ सालातल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी होईल. अर्थात पंतप्रधानांचे वाढत यश त्याच्या सहकारी पक्षांना फारसे रुचणारे नाही.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हेग व ग्राफाइट इंडियाचे जून तिमाहीचे आकडे प्रसिद्ध होतील. सप्टेंबर व डिसेंबर या तिमाहीचेही त्यांचे आकडे उत्तम असणार आहेत. त्यामुळे सध्याच्या भावालाही ते घेतले व वर्षभर ठेवले, तर गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. टाटा मोटर्सचा शेअरही सध्या २५० रुपयांच्या आसपास आहे. जग्वार व लँडरोव्हर गाड्यांचा खप वाढणार असल्याने, या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ अपेक्षित आहे.

डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link