Next
कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन
BOI
Monday, February 12, 2018 | 06:26 PM
15 0 0
Share this story

वाशिम : काव्याग्रह नियतकालिकातर्फे दरवर्षी मराठीतील एका उत्कृष्ट कवितासंग्रहाला ‘काव्याग्रह पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षीपासून हा पुरस्कार नियमितपणे सुरू करण्यात येत आहे. ३१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

‘काव्याग्रह’च्या पहिल्या पुरस्कारासाठी एक जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१७ या तीन वर्षांत प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहांचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी दरवर्षी आधीच्या तीन वर्षांतील उत्कृष्ट कवितासंग्रहांचा विचार करण्यात येईल. कवितासंग्रहाच्या तीन प्रती कवी, प्रकाशक आणि वाचकही पाठवू शकतील. कवितासंग्रह पाठविण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१८ अशी आहे.

कवितासंग्रह पाठविण्यासाठी पत्ता :
विष्णू जोशी, संपादक काव्याग्रह,
ॲड. पाचरणे यांचे घर, राधाकृष्ण नगर, सिव्हिल लाइन्स, वाशिम, ता. जि. वाशिम. ४४४ ५०५
संपर्क : ९६२३१ ९३४८०
ई- मेल : vishnujoshi80@gmail.com

डॉ. विनायक येवले, कार्यकारी संपादक काव्याग्रह
भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड ४३१ ६०६.
संपर्क : ९०९६९ ९९८६५
ई-मेल : yewalevinayak@gmail.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link