Next
पुरंदरसाठी ६६ कोटींचा निधी
BOI
Friday, March 24, 2017 | 06:50 PM
15 0 0
Share this article:

पुरंदर : पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ही माहिती दिली. 

हवेली तालुक्यातील मंतरवाडी-उंड्री-पिसोळी- कात्रज या रस्त्यासाठी ६६ कोटी रुपये मंजूर झाले असून, पुरंदर हवेली मतदारसंघासाठी सर्वाधिक १३२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. रस्ते, रुग्णालये, सिंचन प्रकल्प, प्रशासकीय कार्यालये अशा विविध विकासकामांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. यातील ८० कोटी रुपये केवळ रस्त्यांसाठी मंजूर झाले आहेत. बहुचर्चित गुंजवणी प्रकल्पाच्या पाइपलाइनचेही काम होणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पात ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कामाची सुरुवात होताच जुलैच्या पुरवणी अर्थसंकल्पात या कामासाठी आणखी तरतूद होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search