Next
‘नॅनो टेक्नॉलॉजी’द्वारे आरोग्यदायी हळद रसाची निर्मिती
डॉ. विजय कनुरू यांचे संशोधन
BOI
Saturday, May 18, 2019 | 10:00 AM
15 0 0
Share this article:

डॉ. विजय कनुरू

पुणे : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे घातक आजारांचे प्रमाणही वाढत आहे. यावर हळदीचा रस हा अत्यंत प्रभावी उपाय असल्याचे डॉ. विजय कनुरू यांनी सिद्ध केले असून, त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे हळदीचा रस तयार केला आहे. या हळदीच्या रसाद्वारे प्रदूषणाचे शरीरावरील दुष्परिणाम रोखता येणे शक्य आहे, असा दावा त्यांनी केला आहे. डॉ. विजय कनुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून नॅनो-बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले आहे. आयुर्वेदात हळदीचे अनेक औषधी उपयोग सांगितलेले असून, या नव्या संशोधनामुळे हळदीचा औषधी उपयोग नव्याने सिद्ध झाला आहे.

पाण्यात न विरघळणाऱ्या हळदीला डॉ. कनुरू यांनी आपल्या संशोधनाद्वारे रसाचे स्वरूप दिले आहे. ‘हा रस पाण्यात विरघळण्याजोगा असून, त्यातून कर्क्युमिन  हे औषधी द्रव्य पुरेशा प्रमाणात मिळते. त्यामुळे दररोज सकाळी केवळ एक ते दोन चमचे हळद रसाचे सेवन केल्यास दैनंदिन प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे अनेक विपरित परिणाम टाळणे सहज शक्य आहे. याच्या सेवनाने ‘डेली डीटॉक्स’चे फायदे मिळवता येतात,’ असे डॉ. कनुरू यांनी सांगितले. या हळद रसाला त्यांनी ‘हरस टर्मेरिक ज्यूस’ असे नाव दिले आहे.  

ते म्हणाले, ‘शहरातील वाहनांची गर्दी, बांधकामे, उद्योग यामुळे हवेत प्रदूषणाचे प्रमाण मोठे असते. प्रवास वा कामाच्या निमित्ताने बराच वेळ प्रदूषित हवेत राहावे लागल्यानंतर शारीरिक व मानसिक थकवा आणि तणाव जाणवतो. पीएम २.५ अर्थात अतिसूक्ष्म प्रदूषक कण फुफ्फुसांवाटे रक्तात मिसळत असल्यामुळे ते अधिक त्रासदायक ठरतात. अशा प्रदूषणाच्या त्रासामुळे शरीरात ठिकठिकाणी सूज येऊ शकते, तसेच हृदयाच्या रक्तवाहिन्या, यकृत आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होतात. पुण्यात या प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण मोठे असून, नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे तयार केलेला हळदीचा रस प्रदूषणाच्या दुष्परिणामांना  प्रतिबंध करू शकतो. या रसामुळे शरीराची अंतर्गत स्वच्छता साधली जाते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि त्वचा निरोगी होण्यासाठीही याची मोठी मदत होते.’

‘आपल्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश असला, तरी त्यातून आपल्याला मिळणाऱ्या कर्क्युमिन या औषधी द्रव्याची मात्रा फारच कमी असते. शिवाय जे औषधी गुण त्यातून मिळतात ते शरीरात पूर्णतः शोषले जात नाहीत,’ असेही डॉ. कनुरू यांनी सांगितले. 

‘हरस टर्मेरिक ज्यूसच्या निर्मितीत नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यामुळे त्यात कर्क्युमिन द्रव्याचे प्रमाण चांगले राखता आले, शिवाय ते पेशींमध्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते,’ असे ते म्हणाले.

अधिक माहितीसाठी वेबसाइट : http://www.haras.in/
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ashok Khapare About 95 Days ago
Vary nice
0
0
BDGramopadhye About 96 Days ago
How easy is it to buy ? Is it expensive ?
0
0
BDGramopadhye About 96 Days ago
How easy is it to buy ? How about the marketing ? How much does it cost ?
0
0
BDGramopadhye About 96 Days ago
How expensive is it ? Is it easily available everywhere ? How about the marketing ?
0
0
Amit About 96 Days ago
Nice news. Thanks for sharing
0
0
Kalpak vartak About 96 Days ago
Is this Germanic juice is commercially available without preservatives?
0
0

Select Language
Share Link
 
Search