Next
जीवनविद्या परिवारातर्फे सद्गुरू वामनराव पै यांना आदरांजली.
प्रेस रिलीज
Wednesday, May 31, 2017 | 04:49 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त जीवनविद्या मिशनने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दादरच्या योगी सभागृहामध्ये २९ मे रोजी सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक शिष्यमंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरूप्रणित उपासनायज्ञ व विश्व कल्याणकारी विश्वप्रार्थना जप यज्ञाने करण्यात आली. नामस्मरणाच्या दिव्य लहरींच्या वातावरणात महाराष्ट्रभरातून आलेल्या नामवंत, संगीतविद्येत पारंगत अशा शिष्यांनी सद्गुरूंना संगीत जीवनविद्येच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. त्यानंतर सुप्रसिद्ध उद्योजक व सद्गुरूंचे शिष्य डॉ. सुरेश हावरे यांनी सद्गुरूंच्या आठवणींना उजाळा दिला. २२ मे रोजी सद्गुरूंच्या स्नुषा मिलन प्रल्हाद पै यांचीदेखील पुण्यतिथी असल्याने त्यांच्या जीवनविद्येच्या कार्यालाही या निमित्ताने सलाम करण्यात आला. तसेच जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आशादीप ढगे व प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व जीवनविद्या मिशनचे विश्वस्त आणि अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. या वेळी जीवनविद्या मिशनच्या स्थापनेच्या काळातील दिवंगत नामधारकांचेही स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सद्गुरूंच्या धर्मपत्नी आदरणीय शारदामाई, सद्गुरूंचे सुपुत्र व शिष्य आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

प्रल्हाद पै यांनी ‘लव्ह वर्क, ब्लेस ऑल’ या विषयावर मार्गदर्शन केले. आपण जीवनात प्रत्येकाबाबत कृतज्ञ असण्याचे महत्त्व पटवून देताना प्रल्हाद पै म्हणाले, ‘या कृतज्ञतेचे रूपांतर पुढे भावात, स्वभावात, वृत्तीत, कृतीत व त्यातून पुढे स्वप्नपूर्तीत होत असते. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने प्रगतिपथावर जावे’ हा सद्गुरूंचा महान संकल्प आहे. या ध्येयपूर्तीसाठी प्रत्येकाने एकमेकांबाबत कृतज्ञ असणे व सर्वांच्या भल्याचा विचार करणे फार गरजेचे आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search