Next
लाल गणपती प्रतिष्ठानतर्फे दांडिया स्पर्धेचे आयोजन
BOI
Thursday, October 11, 2018 | 05:42 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : येथील श्री लाल गणपती प्रतिष्ठानमार्फत या वर्षी ‘जोडी तुझी माझी’ दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १४ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी सात वाजता शहरातील श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या मंदिराच्या प्रांगणात होईल. यात स्पर्धक स्त्री-पुरुष, स्त्री-स्त्री किंवा पुरुष-पुरुष असे जोडीने भाग घेऊ शकणार आहेत.

स्पर्धेचे स्वरूप प्राथमिक फेरी आणि नंतर पात्र स्पर्धकांसाठी अंतिम फेरी असे राहील. यासाठी १० मिनिटांचा राउंड असेल. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही ग्रुपशिवाय केवळ अनुरूप जोडीदाराबरोबर आपली नृत्यकला दाखविता येणार आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांसाठी वेळेपूर्वी उपस्थिती, वेशभूषा, पदाललित्य आणि एकमेकांमधील को-ऑर्डिनेशन हे गुण मिळण्याचे प्रमुख निकष राहतील. परिक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील. प्रथम तीन क्रमांक विजेत्या जोडींना अनुक्रमे तीन हजार ३३३ रुपये, दोन हजार २२२ रुपये व आकर्षक चषक व एक हजार १११ रुपये आणि प्रत्येकी आकर्षक चषकाने गौरवण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत. त्यांना श्रीराधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष मिलिंद दळी, योगेश मलुष्टे, नीलेश मलुष्टे व राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षा राधिका मलुष्टे, संध्या भिंगार्डे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

‘आपल्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश शेट्ये यांनी केले आहे.

स्पर्धेविषयी :
दिवस :
रविवार, १४ ऑक्टोबर २०१८
वेळ : सायंकाळी सात वाजता,
स्थळ : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या मंदिराचे प्रांगण, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी.
नावनोंदणीसाठी संपर्क : संध्या भिंगार्डे- ९४२०५ २८००८, अमित कदम- ९१७५५ ९४७४७, उमेश मलुष्टे- ९०११३ ८२९५०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search