Next
राहुल घंबरेची ‘आरटीओ’पदी निवड
प्रेस रिलीज
Wednesday, April 11, 2018 | 04:19 PM
15 0 0
Share this article:

राहुल घंबरे याचा पुणे विद्यार्थी गृहाच्या वतीने नुकताच त्याचा सत्कार करताना मान्यवर

पुणे : पुणे विद्यार्थी गृहाच्या आश्रम वसतिगृहातील माजी विद्यार्थी राहुल मल्हारी घंबरे याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याची सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ इन्स्पेक्टर) या पदावर निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल पुणे विद्यार्थी गृहाच्या वतीने नुकताच त्याचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक कृष्णाजी कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. बहिरट, माजी विद्यार्थी प्रा. सचिन जायभाये यांच्यासह इतर मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

राहुल घंबरेराहुल मूळचा इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील रहिवासी असून, त्याचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. राहुलने जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जीवावर हे यश संपादन केले आहे. याने अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम-टेकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, काही काळ त्याने एका नामांकित कंपनीत नोकरीही केली; मात्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व अधिकारी बनण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे जिद्द व चिकाटीच्या जोरावर वेळेचे योग्य नियोजन व प्रचंड मेहनत घेऊन स्वतःची नोकरी व कुटुंबाचा समतोल राखत हे यश संपादन केल्याने विविध स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याने मला यश मिळविण्याची ताकत व आत्मविश्वास मिळाला आहे. समाजासाठी नक्कीच चांगले काम कारण्याचा प्रयत्न करेन. या यशामध्ये मला कुटुंबाकडून मोठा पाठिंबा मिळाला’, अशी भावना राहुल घंबरे याने व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search