Next
पुस्तक वाचनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
प्रेस रिलीज
Monday, April 15, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this article:पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त लीड मिडिया, अखिल सदाशिव, शनिवार, नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती आणि वंदेमातरम संघटना यांच्या वतीने ‘डॉ. आंबेडकर जयंती नाचून नाही, तर वाचून साजरी करूया’ या अभिनव उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तक वाचनातून आदरांजली अर्पण करण्यात आली.

डॉ. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा वाचनकट्टा येथे कलाकार, साहित्यिक, उद्योजक, विद्यार्थी, शिक्षक आणि माध्यम प्रतिनिधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी एकत्र येऊन पुस्तकांचे वाचन करत आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी लीड मीडियाचे विनोद सातव, उपक्रमाचे आयोजक वैभव वाघ, पुणे महानगरपालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, सचिन जामगे, आकाश गजमल, संतोष देवकर, मंदार आडकर, भूपाल पंडित आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष होते.

या वेळी बोलताना पुणे महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोरे म्हणाले, ‘आज समाजात बाबासाहेबांचे विचार खोलवर रुजवण्याची नितांत गरज आहे. बाबासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येते, की त्यांनी ग्रहण केलेल्या ज्ञान साधनेबद्दल फारच थोडके आपण वाचले आहे. आजही बाबसाहेबांबद्दल वाचताना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.’ वाचनाचे महत्त्व सामन्यांमध्ये रुजवण्याच्या या उपक्रमाचे संजय मोरे यांनी कौतुक केले.

यावेळी बोलताना लीड मीडियाचे प्रमुख सातव म्हणाले, ‘वाचन संस्कृती ही माणसाला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर समृद्ध करते. वाचनामुळे विचार टोकदार बनतात, तसेच भाषेवरील पकड मजबूत होते. बाबासाहेबांनी आयुष्यात भरपूर शिक्षण घेतले. आज त्यांच्या ज्ञानसाधनेतील किमान दोन टक्के ज्ञानाची भर आपल्या जीवनात पडली, तर आपण नक्की यशस्वी होऊ.’

आयोजक वाघ म्हणाले, ‘आंबेडकर जयंती नाचून नाही वाचून साजरी करूयात या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त समाजाला वाचनाचा एक नवा दृष्टिकोन देण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे. पुढील वर्षी वाचनाबरोबरच अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याची इच्छा आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search