Next
काव्यवाचन स्पर्धेला चांगला प्रतिसाद
मराठी संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजन
प्रेस रिलीज
Friday, January 11, 2019 | 03:57 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी अकादमीतर्फे मराठी संवर्धन पंधरवड्यानिमित्त शिक्षक, प्राध्यापक कवींची काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम आझम कॅंपसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये १० जानेवारी २०१९ रोजी झाला.

यात ११० कवींनी सहभाग घेतला. या वेळी प्रसिद्ध कवींच्या मराठी कविता, स्व-रचित कविता, विडंबन गीते सादर करण्यात आली. बशीर मुजावर, सुहासिनी शिरढोणकर यांनी परीक्षण केले. मुमताज पीरभॉय यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मराठी अकादमीच्या नूरजहाँ शेख यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. या वेळी मुख्याध्यापक आयेशा शेख उपस्थित होत्या.  

मराठी संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी केले. या पंधरवड्याचा समारोप १५ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता आझम कॅंपस येथे होणार असून, या वेळी प्राथमिक विभागाचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, परीक्षा परिषदेचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, प्रौढ शिक्षण अल्पसंख्यांक शिक्षण संचालक दिनकर पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी हारून अत्तार उपस्थित राहणार आहेत.

समारोपप्रसंगी कवी प्रदीप निफाडकर यांचा ‘गझलवारी’ हा कार्यक्रम होणार आहे. या पंधरवड्यात मराठी खाद्य प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search