Next
‘झी मराठी’च्या ‘होम मिनिस्टर’ अॅपद्वारे उद्योजिकांना हक्काची बाजारपेठ
‘लोकल’ व्यवसाय ‘ग्लोबल’ करण्याची संधी; ग्राहकांसाठीही उपयुक्त
BOI
Tuesday, March 12, 2019 | 11:00 AM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘वाटा वाटा गं, चालीन तितक्या वाटा गं...’ असे म्हणत स्वावलंबी होण्यासाठी, स्वतःचे घर चालविण्यासाठी वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायांच्या वाटा चोखाळणाऱ्या उद्योजिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘झी मराठी’ने ‘होम मिनिस्टर’ नावाचे अॅप आणि वेबसाइट सुरू केली आहे. उद्योजक आणि ग्राहक यांच्यातील दुवा ठरणारे हक्काचे ऑनलाइन नेटवर्क उपलब्ध करून देऊन ‘झी मराठी’ने उद्योजिकांना आपला ‘लोकल’ व्यवसाय ‘ग्लोबल’ करण्याची संधी या माध्यमातून दिली आहे. तसेच ग्राहकांनाही एकाच क्लिकवर आपल्या आजूबाजूच्या सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या उद्योगांची माहिती मिळणार आहे.

या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी उद्योजिकांनी मोबाइलवर होम मिनिस्टर अॅप डाउनलोड करून किंवा होम मिनिस्टरच्या वेबसाइटवर जाऊन नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये व्यवसायाच्या स्वरूपानुसार गृहउद्योजिका, लघुउद्योजिका आणि मोठ्या उद्योजिका असे तीन विभाग करण्यात आले आहेत. आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार त्यातील योग्य विभाग निवडून उद्योजिकांनी व्यवसायाची माहिती त्यात भरायची आहे. सर्व पर्याय सोप्या मराठी भाषेत दिलेले असल्याने कोणीही अगदी सहजपणे ही माहिती भरू शकते. इंग्रजीमध्ये माहिती भरण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या माध्यमातून उद्योजिकांना अगदी माफक शुल्कात आपल्या व्यवसायाची माहिती लाखो लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहे.

ग्राहक जेव्हा त्यांना हवी असलेली उत्पादने किंवा सेवा यांची माहिती शोधतील, तेव्हा त्यांना सर्व पर्याय दिसतील. त्यामुळे येथील नोंदणीकृत व्यवसायांची माहिती केवळ एका क्लिकच्या माध्यमातून हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. पोळीभाजीचा डबा देण्याच्या घरगुती व्यवसायापासून ते केटरिंगच्या सेवेपर्यंत, हलव्याचे दागिने बनविणाऱ्यांपासून आर्टिफिशिअल ज्वेलरीपर्यंत आणि आर्किटेक्टपासून इंटेरिअर डेकोरेटरपर्यंत विविध व्यवसाय करणाऱ्या वीस हजारांहून अधिक उद्योजिकांनी होम मिनिस्टर अॅपवर नोंदणी केली आहे. 

प्रातिनिधिक फोटो
आता मोबाइल आणि इंटरनेट नेटवर्क गावागावात पोहोचले आहे. त्यामुळे गावातही अगदी घरगुती स्वरूपात छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या गृहिणींनाही आपल्या व्यवसायाची जाहिरात या होम मिनिस्टर अॅपद्वारे सहजपणे करता येणार आहे. अनेकदा घरगुती व्यवसाय करणाऱ्या गृहिणींचा व्यवसाय शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्यापुरताच मर्यादित राहतो किंवा त्यांचा विस्तार ‘माउथ पब्लिसिटी’पुरताच राहतो. व्यवसाय वाढविण्याची इच्छा असूनही त्याकरिता कराव्या लागणाऱ्या जाहिरातीचा खर्च छोट्या उद्योजिकांना परवडत नाही. त्यामुळे अनेक होतकरू उद्योजिकांना आपला व्यवसाय मर्यादित ठेवावा लागतो. ‘झी मराठी’च्या ‘होम मिनिस्टर’ने आता ही अडचण दूर केली आहे.

प्रातिनिधिक फोटो
होम मिनिस्टर अॅप ग्राहकांसाठीही फायद्याचे आहे. मसाले, पापड, पोळी-भाजी, केक बनवून देणाऱ्या कोणी उद्योजिका आपल्या घराजवळ आहेत का? ज्वेलरी, कपडे, सजावटीच्या वस्तू जवळपास कुठे मिळतील? क्लासेस, संगणक सेवा, अन्य छोटे-मोठे उद्योग कुठे आहेत? आपल्या घराजवळ कोणती सेवा, उत्पादने उपलब्ध आहेत, याची सगळी माहिती ग्राहकांना या माध्यमातून एका क्लिकवर मिळू शकते. आपल्याला ज्या ठिकाणची जी वस्तू हवी आहे, ते ‘सर्च’ केले, की ती कुठे आणि कोणाकडे उपलब्ध असेल याची माहिती अॅपवर मिळेल. तिथे दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपण आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करू शकतो. 

हजारो व्यावसायिकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने ग्राहकांना तर उत्तम सुविधा मिळाली आहेच; पण अगदी छोट्याशा गावातील गृहिणीलादेखील मोठ्या बाजारपेठेची कवाडे खुली झाली आहेत. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. यातील तंत्रज्ञानाची बाजू पुण्यातील ‘मायविश्व टेक्नॉलॉजिज’ने सांभाळली आहे. 


झी मराठी देशातच नव्हे, तर परदेशातही पोहोचले आहे. त्यामुळे मराठी माणूस जिथे जिथे असेल तिथे होम मिनिस्टर अॅप पोहोचणार आहे. त्यामुळे उद्योजिकांना आपला व्यवसाय जगाच्या क्षितिजावर नेण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

‘झी मराठी’वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेमधील राधिका सुभेदारने आपला छोटा व्यवसाय वाढवत नेऊन मोठ्या उद्योगात रूपांतर केले. त्याचप्रमाणे नव्या वाटा आणि नवी क्षितिजे शोधण्यासाठी उद्योजिकांनी होम मिनिस्टर या व्यासपीठावर आवर्जून नोंदणी करण्याचे आवाहन ‘झी मराठी’तर्फे करण्यात आले आहे. 

‘होम मिनिस्टर’ची वेबसाइट : https://www.homeminister.com/
अॅप डाउनलोड करण्यासाठी : https://www.homeminister.com/app
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link