Next
‘व्हिक्स’तर्फे ‘टच ऑफ केअर फंड’ची घोषणा
प्रेस रिलीज
Friday, September 14 | 03:48 PM
15 0 0
Share this story

मुंबई : व्हिक्स, या भारताच्या आघाडीच्या सर्दी आणि खोकल्याच्या औषधाच्या ब्रँडने आता पारंपरिक कौटुंबिक वर्तुळाच्या पलीकडे जाऊन उभ्या राहिलेल्या सेवांच्या महान कथांचा गौरव करण्यासाठी एक निधी सुरू केला आहे. ‘टच ऑफ केअर’ या समीक्षकांनी गौरवलेल्या डिजिटल फिल्ममध्ये गौरी सावंत या तृतीयपंथी मुख्य अभिनेत्री आहेत आणि त्या या निधीच्या पहिल्या लाभार्थी असतील. त्यांनी समाजाने वाळीत टाकलेल्या एका मुलीला आपल्या पंखाखाली घेतले आणि तिला एक चांगले आयुष्य तसेच शिक्षण दिले. ब्रँडकडून मिळालेल्या निधीचा वापर करून त्या नानी का घर या गरजू मुलांसाठीच्या गृहाच्या उभारणीसाठी करणार आहेत.

‘व्हिक्स’ने ‘टच ऑफ केअर फंड’चे अनावरण एखाद्याच्या आयुष्यात सर्वांगीण बदल घडवून आणणाऱ्या आगळ्यावेगळ्या कार्यांची ओळख आणि गौरव करण्यासाठी केले आहे. या फंडचे उद्दिष्ट अत्यंत खडतर परिस्थितीत समोर आलेल्या सेवांच्या शक्तिशाली कथांना आर्थिक सहकार्य देऊन इतरांसाठी प्रेरणा म्हणून पुढे येण्याचे आहे.
 
#टचऑफकेअरफंड (#TouchofCare) फंडच्या अनावरणाबाबत बोलताना ‘व्हिक्स’च्या ब्रँड मॅनेजर रितू मित्तल म्हणाल्या, ‘व्हिक्स हा ब्रँड भारतात मागील ५० वर्षांपासून आहे आणि भारतातील कुटुंबांच्या आयुष्याला स्पर्श करून त्यांची काळजी घेण्यासाठी अनेक पिढ्यांनी त्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही या मोहिमेला काळजीची एक वेगळी व्याख्या देणाऱ्या कथा, तसेच एक बदल घडवून आणण्यासाठी आपल्या मर्यादा पार करून पुढे जाणाऱ्या लोकांच्या कथा प्रत्यक्षात उतरवण्याचे माध्यम म्हणून सुरूवात केली आहे. या मोहिमचे यश सद्गदित करणारे आहे. कारण त्यांनी अनेक आयुष्यांना स्पर्श केला आहे आणि आम्ही हे प्रयत्न आमच्या #टचऑफकेअरफंडच्या अनावरणाद्वारे पुढे चालू ठेवू इच्छितो. जगाला एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी आभार मानण्याची ही आमची एक पद्धत आहे.’

‘व्हिक्स टच ऑफ केअर’ने मला माझी गोष्ट जगाला सांगण्यास मदत केली आहे. त्यांनी जगाला माझी ओळख एक आई म्हणून करून दिली. त्यांनी लोकांना हे दाखवले की मातृत्व लिंगनिरपेक्ष असते आणि मला विविध लोक तसेच संघटनांकडून मिळालेले सहकार्य हे त्याचे प्रतीक आहे. आता, व्हिक्स टच ऑफ केअर फंडच्या मदतीने मला ‘नानी का घर’च्या माध्यमातून सोडून दिलेल्या आणि दुर्लक्षित मुलांना काळजी आणि निवारा देणे शक्य होईल. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मदत केल्याबद्दल मी ‘व्हिक्स’ची कायम आभारी राहीन. मला आशा आहे की या फंडमुळे अनेक गरजवंताना जास्त चांगल्या पद्धतीने सेवा देता येईल,’ असे गौरी सावंत यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link