Next
अभिजीत सूर्यवंशीची उहान विद्यापीठात निवड
प्रेस रिलीज
Thursday, October 11 | 04:15 PM
15 0 0
Share this story

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाइल टेक्नॉलॉजीमध्ये शिकत असणारा अभिजीत सूर्यवंशी याची राष्ट्रपती स्कॉलरशीपअंतर्गत चायना येथील उहान युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर प्रोग्रॅम इन डाइंग अँड फिनिशिंग या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती असून, यामध्ये शैक्षणिक फी, इतर शैक्षणिक खर्च, राहण्याचा, खाण्याचा खर्च, विमा आदींचा समावेश आहे.

चीनमधील उहान युनिव्हर्सिटी ही वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत प्रमुख शिक्षण देणारी युनिव्हर्सिटी आहे असून, यामार्फत संपूर्ण आशिया खंडातून मोजक्याच विद्यार्थ्यांची स्कॉलरशीपसाठी निवड करते. यापूर्वी डीकेटीईतून चीन येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झालेले बी. टेक्स्टाइलचे विद्यार्थी उमेश पाटील, मोसीन नाईकवडे, उमर इनामदार, राहुल नाविक व शिवराज करांडे हे शिक्षण पूर्ण करून चीन येथे कार्यरत आहेत. सुरज साखरपे व राकेश खंडेलवाल हे द्वितीय वर्षात शिक्षण पूर्ण करीत आहेत. कोणत्याही प्रकारची शैक्षणिक फी व इतर खर्च न करता डीकेटीईतील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी डीकेटीईने उपलब्ध करून दिली आहे.

अभिजीत सूर्यवंशीडीकेटीईमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांना आमंत्रित करून त्यांची व्याख्याने व मागदर्शन आयोजन करण्यात येते. याचा फायदा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी व इंटरनॅशनल प्लेसमेंटसाठी होत आहे. डीकेटीईला ‘एआयसीटीई’ने अॅडिशनल फॉरेन कोटा मंजुर केलेला असल्यामुळे परदेशातील विद्यार्थी देखील डीकेटीईमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी उत्सुक आहेत.

डीकेटीईचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, तसेच सर्व ट्रस्टींनी विद्यार्थ्यांस भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link