Next
डॉ. योगेश उपाध्याय ‘एफआयटीएस’च्या अध्यक्षपदी
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 06:21 PM
15 0 0
Share this story

डॉ. योगेश उपाध्याय
पुणे: व्यावसायिक प्रशिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेनर्स अँड स्पीकर्स’ (एफआयटीएस) या संस्थेच्या अध्यक्षपदी पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’मधील (एआरएआय) डॉ. योगेश उपाध्याय यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. उपाध्याय एआरएआयमधील ‘एचइएम अँड ए’ विभागाचे उपसरव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

‘एफआयटीएस’च्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पुण्यात घेण्यात आली. या वेळी डॉ. योगेश उपाध्याय यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड होणारे डॉ. उपाध्याय हे पहिलेच भारतीय ठरले आहेत.

यापूर्वी जॉर्डन येथील डॉ. युनुस खात्याबेह या संस्थेच्या अध्यक्षपदी होते. या निवडणुकीत सुदानचे डॉ. खालिद बिन अली ओमार हे संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.‘एफआयटीएस’मध्ये वेगवेगळ्या देशांमधील प्रशिक्षक, वक्ते आणि या क्षेत्रातील सल्लागारांचा समावेश आहे. संस्थेच्या महासचिवपदी डॉ. सेनान शेगदेह (यूएसए), प्रमाणीकरण संचालक या पदी डॉ. ए. बी. दादास (भारत), तर, संचालक मंडळात डेव्हिड चाड्रॉन (यूएसए), डॉ. जिदापा (थायलंड), डॉ. मुशर्रफ हुसेन (बांग्लादेश), डॉ. अलशोका जिंदासा (श्रीलंका), डॉ. खोदेर मेहलेम (लेबनन), डॉ. घॅसन ओवेसिस (जॉर्डन), डॉ. सुनंता लाओहानान (थायलंड), डॉ. अजहर कासीम यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link