Next
महिंद्रा ट्रॅक्टरची सर्वाधिक देशांतर्गत वार्षिक विक्री
प्रेस रिलीज
Monday, April 16, 2018 | 03:48 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा समूहातील महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) आर्थिक वर्ष २०१८मध्ये तीन लाखांहून अधिक युनिटची विक्री करून ट्रॅक्टर उद्योगामधील आघाडीचे स्थान कायम राखले आहे. यामुळे कंपनीने आर्थिक वर्ष १८मध्ये आजपर्यंतची सर्वाधिक वार्षिक ट्रॅक्टर विक्री केली आहे व देशांतर्गत बाजारात २२ टक्के वाढ नोंदवली आहे.

संख्येच्या बाबतीत सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी असलेल्या ‘महिंद्रा’ने या आर्थिक वर्षात देशांतर्गत बाजारात तीन लाख चार हजार १९ युनिटची विक्री केली आणि या आर्थिक वर्षांत एकूण तीन लाख १९ हजार ४६८ युनिटची (देशांतर्गत + निर्यात) विक्री करून, अनुक्रमे २२ टक्के व २१ टक्के वाढ साध्य केली. सध्या, भारतीय ट्रॅक्टर उद्योगात ‘महिंद्रा’चा हिस्सा ४२.९ टक्के आहे आणि गेली ३५ वर्षे आघाडीचे स्थान कायम राखले आहे.

या उद्योगाविषयी बोलताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, ‘तंत्रज्ञानावर आधारित असलेली आमची उत्पादने शेतकऱ्यांच्या गरजांविषयी आमच्या सखोल आकलनावर व उत्पादने प्रभावी ठरावीत या विचारावर बेतलेली आहेत. स्थापना झाल्यापासून, आम्ही तंत्रज्ञान-प्रणित नावीन्य व गुणवत्ता-प्रणित उत्कृष्टता यामार्फत फार्म टेक प्रॉस्परिटी साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या माध्यमांची क्षमता व सर्वंकष उत्पादने यांची सांगड घालून आम्ही एका वर्षात आजवरची सर्विक विक्री नोंदवली आहे. ट्रॅक्टरची विक्री करण्याच्या पलीकडे विचार करून, शेतीच्या दृष्टीने निरनिराळ्या सुविधा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’

संख्येच्या बाबतीत ट्रॅक्टर उद्योगातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी म्हणून ‘महिंद्रा’ने आपल्या उत्पादनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या बाबतीत नेहमीच आघाडी राखली आहे; तसेच, नवे ट्रॅक्टर दाखल करून कंपनीने शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध होऊ शकतील, अशी शेतीसाठी नवी व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सरस सोल्यूशन आणली आहेत.

एप्रिल २०१७मध्ये, कंपनीने अत्याधुनिक, दर्जेदार तंत्रज्ञान असलेला जिवो हा उप २५ एचपी श्रेणीतला आणि रो कॉर्प व फुलबाग शेतीसाठी साजेसा असलेला लहान ट्रॅक्टर दाखल केला, तर फेब्रुवारी २०१८मध्ये स्वराज ९६३एफई हा ६०-७५ एचपी श्रेणीतील उच्च क्षमतेचा ट्रॅक्टर दाखल केला. यापूर्वी, एप्रिल २०१६मध्ये दाखल केलेला युवो व ऑगस्ट २०१४मध्ये सादर झालेला नोवो यांनीही कंपनीच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. एप्रिल २०१६मध्ये दाखल झालेला व या उद्योगातील पहिला व विशेष १२F+३R फुल कॉन्स्टंट-मेश गिअरबॉक्स असलेल्या नव्या सुविधेवर आधारित असलेला महिंद्रा युवो हा अत्यंत वैविध्यपूर्ण आहे व शेतीतील ३०हून अधिक कामांसाठी वापरता येऊ शकतो.

चेन्नई येथील ‘महिंद्रा’चे जागतिक संशोधन केंद्र असलेल्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये इन-हाउस डिझाइन व विकसित करण्यात आलेला महिंद्रा नोवो हा पहिला नवा ट्रॅक्टर आहे. उच्च हॉर्स पॉवरच्या श्रेणीमध्ये त्याने निश्चितच नवा पायंडा पाडला. ‘महिंद्रा’च्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादनांनी उत्पादकता व भरभराट यांना शक्य तितकी चालना दिली आहे; तसेच शेतकऱ्यांचा उदय (राइज) होण्यासाठी मदत केली आहे.

कंपनीने पहिलेवहिले इंटलिजंट ट्रॅक्टर तंत्रज्ञान – नावीन्यपूर्ण व या उद्योगातील पहिले – दर्शवून तंत्रज्ञानाद्वारे प्रवर्तन आणण्यामध्ये सातत्य राखले आहे. भारतीय शेतीतील अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे महिंद्राने भारतीय शेतकऱ्यांच्या पूर्ण न झालेल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पर्याय निर्माण करण्यासाठी ही वाटचाल सुरू केली आहे. चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅली या महिंद्रा समूहाच्या नावीन्य व तंत्रज्ञान केंद्रामध्ये विकसित करण्यात आलेला बुद्धिमान स्वायत्त ट्रॅक्टर जागतिक स्तरावरील शेतकऱ्यांसाठी नव्याने यांत्रिकीकरण उपलब्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे.

उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटायझेशन हा घटक मुख्य ठरत असून, कनेक्टेड व्हेइकल तंत्रज्ञान हे त्याचे एक उदाहरण आहे. ‘महिंद्रा’ने विकसित केलेले डिजिसेन्स (DiGiSENSE) हे पहिलेच तंत्रज्ञान आहे जे विविध उत्पादनांसाठी व विविध वापरासाठी उपयुक्त आहे. हे विशेष तंत्रज्ञान ट्रॅक्टर व मालक यांना एकमेकाशी जोडते व ट्रॅक्टरच्या वापरावर नियंत्रण ठेवणे व गैरवापर टाळणे यासाठी मालकाला मदत करते. या स्मार्ट अॅप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या ट्रॅक्टरचे ठिकाण व कामगिरी यांची २४x७ डिजिटल पद्धतीने माहिती घेता येईल. शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टरचा वेळोवेळी मागोवा घेता येईल; तसेच दूरवरून निदान व अहवाल यामुळे त्यांना ट्रॅक्टरचे आरोग्य व उत्पादकता याविषयीच्या निकषांची पाहणी करणे शक्य होईल.

ट्रॅक्टर श्रेणीमध्ये क्लाउड-आधारित तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करणारी ‘महिंद्रा’ ही भारतातील पहिली ओईएम आहे. सध्या, महिंद्राकडे <30 एचपी ते 75 एचपी, तसेच प्राथमिक, आधुनिक व स्मार्ट असे वैविध्यपूर्ण व सर्वंकष ट्रॅक्टर आहेत. सर्व उत्पादनांमुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होते. ग्राहक केंद्रितता आणि खर्चाच्या व्यवस्थापनाद्वारे उच्च दर्जाची, परवडणारी उत्पादने तयार करणे हे ‘महिंद्रा’च्या यशाचे गमक आहे. डिझाइनच्या टप्प्यापासून सुरुवात होऊन विक्रीनंतरच्या पाठिंब्यापर्यंत, प्रत्येक स्तरामध्ये ग्राहकांना सहाय्य केले जाते व नव्या उत्पादनांची विविध प्रकारच्या वापरासाठी कसून चाचणी केली जाते.

‘महिंद्रा’ने भारतीय शेती क्षेत्राच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी व शेतीची भरभराट करण्यासाठी ट्रॅक्टरच्या पलीकडेही व्यवसाय विस्तारला आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या भारतासारख्या देशात महिंद्रा शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने व प्रगती करण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपप्ट करण्याच्या व फार्मिंग ३.० साठी योगदान देण्याच्या हेतूने शेतीच्या भरभराटीला चालना देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या दृष्टीने समृद्धी, मायअॅग्रीगुरू व ट्रिंगो हे कंपनीने फार्म टेक प्रॉस्परिटीची बांधिलकी जपण्यासाठी आणले आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link