Next
राज्यात मध्यावधी निवडणुका होणार?
प्रभात
Wednesday, March 01, 2017 | 02:34 PM
15 0 0
Share this article:



मुंबई : राज्यात नुकताच झालेल्या महापालिका, जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची 25 वर्षाची तुटली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षाना बहुतम मिळवता आले नाही. त्यामुळे मुंबईचा महापौर आपला व्हावा म्हणून दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाला आहे.

भाजपने या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवले. नाशिक, पुणे, पिंपरी -चिंचवड, नागपूर, उल्हासनगरमध्ये भाजपला चांगले यश मिळाले त्यामुळे राज्यात ही आपल्याला चांगले यश मिळू शकते असे भाजपला वाटत आहे. शिवसेनेकडून होणारी सततची टीका यामुळे शिवसेनेसोबत सतेत राहणे भाजपला कठीण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यामध्ये एका नव्या प्लॅनवर चर्चा झाल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने सांगितले आहे. आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपला जर चांगले यश मिळाले तर मग महाराष्ट्रात शिवसेनेशी कायमची युती तोडून स्वबळावर निवडणुका लढून राज्यातही सत्ता आणण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्यामुळे राज्यात मध्यवती निवडणुका होणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search