Next
‘भय्यूजी महाराजांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात पोकळी’
प्रेस रिलीज
Wednesday, June 13 | 10:39 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘समाजाच्या उपेक्षित घटकांच्या सेवेसाठी झटणारे राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्या अकस्मिक निधनामुळे सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी १२ जून रोजी व्यक्त केली.

दानवे म्हणाले की, ‘भाजप महाराष्ट्रतर्फे आपण भय्युजी महाराज यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. अध्यात्माच्या ओढीने भय्यूजी महाराज यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील चांगले करिअर, तसेच मॉडेलिंगचे क्षेत्र सोडले. अध्यात्मिक क्षेत्रात साधना करतानाच त्यांनी समाजाच्या सेवेला वाहून घेतले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात मदत, गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अशी अनेक कामे त्यांनी केली. अनेक प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती त्यांच्या भक्त होत्या व समाजातील आपल्या स्थानाचा वापर त्यांनी उपेक्षितांच्या सेवेसाठी केला. शेतकरी आणि ग्रामीण भाग हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link