Next
वूनिकचे ‘द क्वीन्स कलेक्शन’
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 04:49 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय फॅशन क्षेत्रातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वूनिक डॉटकॉमने उत्सवी हंगामासाठी ‘द क्वीन्स कलेक्शन’ हे विशेष पारंपरिक दागिन्यांचे कलेक्शन सादर केले आहे. 

सध्या फॅशनच्या बाजारपेठेत दागिन्यांच्या ट्रेंड्समध्ये अमूलाग्र बदल होत आहेत, पारंपरिक दागिन्यांना पुन्हा वैभव प्राप्त होत आहे. हा कल लक्षात घेऊन अतिशय सुंदर अशा दागिन्यांचा नजराणा त्यांनी पेश केला आहे. यामध्ये महिलांकरिता सुखी सबलाईम गोल्ड प्लेटेड चोकर नेकलेस, आकर्षक पर्ल्स व्हाईट कलर नेकलेस सेट, गोल्ड प्लेटेड बांगड्या, युबेला ज्वेलरी पारंपरिक गोल्ड प्लेटेड फॅन्सी पार्टी वेअर झुमका, युबेला ज्वेलरी, पारंपरिक गोल्ड प्लेटेड ज्वेलरी तसेच; पारंपरिक अँटिक मरून कुंदन सेट आदींचा समावेश आहे. 

सुखी सबलाईम गोल्ड प्लेटेड चोकर नेकलेस हा तांबे या धातूपासून तयार करण्यात आला असून अँटिक फिनिशिंगसह या दागिन्याला पारंपरिक रूप देण्यात आले आहे. स्वराज शॉपमधील आकर्षक आणि अप्रतिम पर्ल्स व्हाईट कलर नेकलेस सेट तांब्याच्या धातूपासून बनविलेला असून टिकाऊ आणि त्वचेला अनुकूल असणारा आहे. गोल्ड प्लेटेड बांगड्या तुमच्या पारंपरिक वॉर्डरोबमधील आकर्षक बांगड्यांची भर घालतील. 

युबेला ज्वेलरी पारंपरिक गोल्ड प्लेटेड फॅन्सी पार्टी वेअर झुमका / झुमकी कोणत्याही प्रसंगासाठी योग्य असे स्टायलिश आणि ट्रेंडी दागिने आहेत. तर पारंपरिक अँटिक मरून कुंदन सेटचा बेस तांब्याचा असून त्यावर काळ्या आणि सोनेरी रंगाचा मुलामा देण्यात आला आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link