Next
प्रश्नोत्तर रत्न मालिका (सचित्र)
BOI
Monday, March 11, 2019 | 10:24 AM
15 0 0
Share this story

अद्वैताचा सिद्धांत मांडणाऱ्या आदि शंकराचार्य यांनी भारतभर भ्रमण करून हिंदू धर्माची पुन:स्थापना केली. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे व काव्ये रचली आहेत. आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात प्रश्नोत्तर रत्नमालिकेची पद्य स्वरूपात रचना केली. प्रश्न आणि त्याची उत्तरे असे यातील श्लोक आहेत. याचे मराठी रूपांतर पां. ह. कुलकर्णी यांनी ‘प्रश्नोत्तरे रत्न मालिका (सचित्र)’मधून केले आहे.

एकूण १३० प्रश्न आहेत. प्रथम संस्कृत, नंतर इंग्रजी व मराठी असा त्याचा क्रम आहे. याशिवाय विषयाला अनुसरून छायाचित्रे, चित्रे व रेखाचित्रे दिली आहेत. पहिला प्रश्न ‘महाराज, काय घ्यावयाचे असते?’ हा असून त्यावर ‘गुरूचे बोलणे,’ असे उत्तर आहे. सर्वांत उपयोगी गोष्ट सदाचरण, गुरू अपराध म्हणजे विषासमान आहे. स्वतः आणि इतरांच्या हिताची कामे करणे हे माणसासाठी सर्वोत्तम असते, असा संदेश यातून दिला आहे. सद्वर्तनाने, प्रामाणिकपणे आनंदी आयुष्य कसे जगता येते, हे यातील प्रश्नोत्तरातून समजावून दिले आहे.

पुस्तक : प्रश्नोत्तर रत्नमालिका
लेखक : पांडुरंग कुलकर्णी
प्रकाशक : दीर्घायु इंटरनॅशनल
पाने : १४४
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link