Next
चित्रकला स्पर्धेत मृण्मयी केंगे देशात प्रथम
BOI
Thursday, August 09 | 01:10 PM
15 0 0
Share this story

नाशिक : नाशिकची मृण्मयी अनुराग केंगे कॅमल कंपनीने देशपातळीवर आयोजित केलेल्या ‘कॅमल आर्ट कॉन्टेस्ट’ या चित्रकला स्पर्धेत संपूर्ण भारतात पहिली आली आहे. 

या स्पर्धेत दुसरा क्रमांक नैनिताल, नवी दिल्ली येथील विद्यार्थिनींना विभागून, तर तिसरा क्रमांक मदुराई, गाझियाबाद आणि चेन्नई येथील विद्यार्थ्यांना मिळाला आहे. 

छोट्या गटातील विद्यार्थी ते अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सर्व गटांत मिळून एकूण ५० लाख ७० हजार ६८० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. त्यामधून प्राथमिक, विभागीय व अंतिम फेरीसाठी एकूण ९७ विद्यार्थी निवडले गेले. यामधून मृण्मयीने पहिला क्रमांक पटकावला. 

मृण्मयी सध्या ‘कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि डिझाइन्स’मध्ये शिकत आहे. पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे चित्र तिने अतिशय बारकाव्यांसह आकर्षक रंगसंगतीत साकारले आहे. तिने काढलेले चित्र सोबत दिले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link