Next
महाराष्ट्राच्या पंचकन्या
BOI
Wednesday, May 08, 2019 | 10:32 AM
15 0 0
Share this article:

एकोणिसाव्या शतकातील कर्तृत्ववान महिलांची ओळख अशोक बेंडखळे यांनी ‘महाराष्ट्राच्या पंचकन्या’मधून करून दिली होती. न्यायमूर्ती रानडे यांच्या द्वितीय पत्नी रमाबाई रानडे यांनी न्या. रानडे यांच्या हाताखाली शिक्षणाचे व समाजसेवेचे धडे घेतले. पतीच्या पश्चात सेवासदन संस्थेची स्थापना करून गरीब संसारी स्त्रियांना रोजगार व शिक्षण दिले. त्यांची कहाणी यातील पुस्तकात सांगितली आहे.

महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा काढणारे ज्योतिराव फुले यांना समर्थ साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी चरित्रही वाचायला मिळते. रूढी, परंपरेत अडकलेल्या स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांचा प्रगतीचा मार्ग ‘शारदा सदन’ या संस्थेद्वारे खुला करणाऱ्या पंडिता रमाबाई, कवी रेव्ह. ना. वा., टिळक यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांचे समाजकार्य, ख्रिस्त धर्म स्वीकारण्याचे धाडस आणि साहित्यिक म्हणून त्यांची ओळख या मालिकेतील एका पुस्तकातून होते. अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्यभर झटलेले महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी भक्कम साथ दिली. त्यांचे कार्यकर्तृत्व सांगणारे एक पुस्तक या मालिकेत आहे.  
     
पुस्तक : महाराष्ट्राच्या पंचकन्या 
लेखक : अशोक बेंडखळे
प्रकाशक : राजा प्रकाशन
पाने : २४७
किंमत : ३०० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search