Next
‘पर्यटकांनी बिनधास्त काश्मीरला यावे’
शफाकत अहमद यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Tuesday, December 04, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘पर्यटकांसाठी काश्मीर अतिशय सुरक्षित ठिकाण आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांचे अतिथ्य आम्हाला करायचे आहे. काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सर्वतोपरी सुरक्षा देण्यासाठी आमचा पर्यटन विभाग तयार आहे. त्यामुळे पुणेकरांनी बिनधास्तपणे काश्मीरला यावे’, असे आवाहन जम्मू-काश्मीर पर्यटन विभागातील सहायक अधिकारी शफाकत अहमद यांनी केले.

पुण्यात नुकतेच पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांचे प्रदर्शन भरले होते. त्यानिमित्ताने शफाकत अहमद यांच्यासह जम्मू-काश्मीर येथील पर्यटन व्यावसायिकांनी पुण्यातील व्यावसायिकांशी संवाद साधला. या वेळी मकसूद बदियारी, शाबीर भट, अबिद मत्तु, नासिर हुसेन या काश्मिरी व्यवसायिकांसह पुण्यातील ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री, ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे डॉ. विश्वास केळकर यांच्यासह इतर व्यावसायिक उपस्थित होते.

या वेळी काश्मीर आणि पुण्यातील व्यावसायिकांनी काश्मीर खोऱ्यातील पर्यटनासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तेथे पर्यटकांना येणाऱ्या अडचणी, चांगली ठिकाणे, राहण्याखाण्याची व प्रवासाची व्यवस्था यावरही चर्चा झाली. जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती शफाकत अहमद यांनी उपस्थितांना दिली.

जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे सहायक अधिकारी शफाकत अहमद यांचे स्वागत करताना ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे डॉ. विश्वास केळकर, ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री व अन्य व्यावसायिक.
शफाकत अहमद म्हणाले, ‘पर्यटकांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेत. काश्मीर हा पृथ्वीवरील स्वर्ग मानला जातो. येथे येणारा प्रत्येक पर्यटक आमच्यासाठी देव आहे. पर्यटकांनी सुरक्षेबाबतची भीती मनातून काढून टाकावी. पुण्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या नेहमीच अधिक राहिलेली आहे. त्यामुळे पुणेकर पर्यटकांचे काश्मीरमध्ये स्वागत आणि आदरातिथ्य करण्यासाठी काश्मिरी जनता उत्सुक आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link