Next
‘८३’ची टीम भेटली नामवंत क्रिकेटपटूंना
अभिनेता रणवीर सिंगने शेअर केले फोटोज
BOI
Wednesday, June 05, 2019 | 01:28 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : अभिनेता रणवीर सिंग नायक असलेल्या आगामी ‘८३’ या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या लंडनमध्ये सुरू आहे. चित्रपटात माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत असलेल्या रणवीरने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकाचे औचित्य साधत तिथे आलेल्या क्रिकेटविश्वातील काही दिग्गजांची भेट घेतली. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न, व्हिवियन रिचर्ड्स यांच्यासोबतचे काही फोटोज रणवीरने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

माजी क्रिकेटपटू कपिल देव हे भारतीय संघाचे कप्तान असताना १९८३मध्ये भारताने पहिला-वहिला विश्वचषक जिंकला होता. या विषयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट असून, रणवीर सिंग यात ‘कपिल देव’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. लंडनमध्ये सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असून चित्रपटाच्या टीमने नुकतीच दिग्गज क्रिकेटपटूंची भेट घेतली आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्यांच्या धर्तीवर भारतीय संघाने १९८३मध्ये इंग्लंडमध्येच जिंकलेल्या विश्वचषकाच्या आठवणींना कपिल देव यांनी उजाळा दिला. 

लिटल मास्टर सुनील गावस्कर, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्पाइन किंग शेन वॉर्न यांच्याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू व्हिवियन रिचर्ड्स या सगळ्यांना भेटून रणवीरने आपण खूप आनंदी झाल्याचे म्हटले आहे. या सगळ्यांसोबत काढलेले फोटोज रणवीरने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जागतिक क्रिकेटविश्वात आपापले एक अढळ स्थान कायम करणारी ही मंडळी आहेत. यांना भेटण्याचा आनंद कोणालाही असेलच. 

दरम्यान रणवीरने कपिल देव यांच्यासोबतचे काही फोटोज नुकतेच शेअर केले होते, ज्यामध्ये रणवीर हातात नोटबुक आणि पेन घेऊन दिसला, जणू तो कपिल देव यांच्याकडून काही टिप्स लिहून घेत होता. चित्रपटात रणवीरव्यतिरिक्त साकिब सलीम, आदीनाथ कोठारे, चिराग पाटील, हार्डी संधू, जतीन सारना, आर. बद्री, साहिल खट्टर, ताहिर राज भासिन, दिनकर शर्मा, धैर्य कारवा आणि निशांत दहिया हे कलाकार दिसणार आहेत. प्रितम चक्रवर्ती यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. रणवीर नायक असलेल्या चित्रपटासाठी ते पहिल्यांदाच काम करत आहेत. पुढच्या वर्षी १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search