Next
संगीतकार शंकर यांचा पियानो ‘एनएफएआय’मध्ये
BOI
Wednesday, September 12 | 01:03 PM
15 0 0
Share this story

संगीतकार शंकर यांच्या पियानोसह संदीप आपटे व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील (एनएफएआय) दुर्मीळ ठेवा आणखी समृद्ध झाला असून, त्यात एका अनमोल वस्तूची भर पडली आहे. प्रख्यात संगीतकार शंकर यांचा पियानो येथे दाखल झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या मधुर संगीताने राज्य करणाऱ्या शंकर-जयकिशन या जोडीतील शंकर यांचा हा पियानो, त्यांचा नातू संतोषकुमार याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्रदान केला आहे. हा पियानो सुमारे ९० ते शंभर वर्षे जुना आहे. 

संगीतकार शंकर
८८ बटणे आणि साडेसात सप्तके (ऑक्टेव्ह) असलेला, जर्मनीतील स्टुटगार्ट येथे बनविण्यात आलेला हा पियानो म्हणजे हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. त्यामुळे तो अमूल्य ठेवा आहे. यावरच शंकर यांनी अवीट गोडीच्या अनेक चाली रचल्या. पियानो हे खरे तर पाश्चात्य वाद्य; मात्र हिंदी चित्रपट संगीताला नवीन आयाम देताना शंकर यांनी या वाद्याचा लीलया वापर केला. पारंपारिक संगीताचा गाभा कायम ठेवून, त्याला आधुनिक रूप देण्यात पियानोची भूमिका महत्त्वाची ठरली. हिंदी चित्रपटाचे नायकदेखील पियानो वाजवताना दिसू लागले. 

शंकर -जयकिशन
काळाच्या पुढे जाऊन भारतीय चित्रपट संगीतात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शंकर-जयकिशन या जोडीने संगीत दिलेली गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. शंकर-जयकिशन यांचे चाहते असलेले संदीप आपटे यांच्या प्रयत्नांमुळे हा पियानो राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आला आहे. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link