Next
गावित यांनी साधला यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद
प्रेस रिलीज
Tuesday, May 15, 2018 | 05:01 PM
15 0 0
Share this article:पालघर : भाजप उमेदवार डॉ. राजेंद्र गावित यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धडाक्यात सुरुवात केली असून, प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी नालासोपारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांशी संवाद साधला. सकाळी सात वाजल्यापासून रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत त्यांनी विस्ताराने चर्चा केली. या वेळी त्यांच्यासोबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यानंतर दिवसभरात त्यांनी वसई आणि विरार रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांशी संवाद साधला.

सोमवारी सकाळपासूनच रेल्वे प्रवाशांशी सुरू केलेल्या या संवाद मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे आपल्या समस्यांबाबत भाजपचे उमेदवार डॉ. गावित यांच्याशी चर्चा केली. भाजपचे दिवंगत खासदार अॅड. चिंतामण वनगा यांनी सुरू केलेली विकासाची कामे पुढे सुरू ठेवण्याचा मनोदय या वेळी डॉ. गावित यांनी व्यक्त केला; तसेच रेल्वे प्रवाशांच्या समस्या संसदेत मांडून त्यावर रेल्वे मंत्रालयाकडून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

याबाबत बोलताना राज्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘पालघर जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकावरून मुंबईत रोजगारासाठी दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाबाबत अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी फार पूर्वीपासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या प्रश्नांबाबत या परिसरात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांकडून अडचणी जाणून घेत त्यांच्या सोडवणुकीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार.’

दिवंगत खासदार अॅड. वनगा यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांची खरेतर नव्याने माहिती देण्याची आवश्यकता नाही; मात्र मतदारांशी संवाद साधत, तसेच पत्रकाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची उजळणी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. ‘भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो सर्वसामान्य जनतेसाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतो,’ असेही त्यांनी सांगितले.


(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search