Next
महिला शाहिराने दिला ‘मुलगी वाचवा’चा संदेश
BOI
Wednesday, January 09, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ हे अभियान विविध माध्यमांतून तळागाळापर्यंत पोहोचविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावात एक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. सांगली येथील शाहीर अनिता खरात यांनी रोपळेवासीयांना मुलगी वाचविण्याचा संदेश लोककलेच्या माध्यमातून दिला. शाहिरी लोककला सांस्कृतिक विकास केंद्राच्या पथकातर्फे हा कार्यक्रम झाला. 

येथील यादवकालीन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख यांनी भूषविले. या वेळी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, सरपंच दिनकर कदम, कान्हापुरीच्या सरपंच स्मिता पाटील, विस्तार अधिकारी सुरेंद्र पिसे, अंगणवाडी सुपरवायझर जया वाकसे, अंगणवाडी सेविका कल्पना मोरे, यु. एस. देशपांडे, अनिता बंडगर, सविता गायकवाड, सारिका राऊत, सुरेखा गाडे, कामिनी लोखंडे, सुचिता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना महिला व बालकल्याण सभापती देशमुख म्हणाल्या, ‘मुलींनाच आपल्या आई-वडिलांची जास्त काळजी असते. म्हणून खरा वारसदार मुलगीच असते. त्यामळे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना हे सुंदर जग बघू द्यावे. महिला व मुलींच्या सबलीकरणासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने खूप चांगल्या योजना आणल्या आहेत. यामध्ये सध्या जिल्ह्यात पाच हजार मुलींना मोफत कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे. अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी भरपूर निधी उपलब्ध केला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मुलींच्या शिक्षणासाठी दहा हजार रुपये दिले जात आहेत. शिलाई मशीन व पिकोफॉल मशीनचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे.’

या वेळी सरपंच कदम, पंचायत समितीचे सभापती पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी पिसे यांनी आभार मानले.

(सोबत व्हिडिओ देत आहोत)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link