Next
‘हिमालया’च्या नव्या जाहिरातीत काजल अग्रवाल
प्रेस रिलीज
Saturday, May 05, 2018 | 05:30 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘द हिमालया ड्रग’ कंपनी या भारतातील आघाडीच्या देशी वेलनेस ब्रँडने हिमालया काजलची नवी जाहिरात (टीव्हीसी) सादर केली. या जाहिरातीत आपल्या सुंदर, बोलक्या डोळ्यांसाठी प्रसिद्ध असलेली सौंदर्यवती अभिनेत्री काजल अग्रवाल दिसणार आहे.

डोळे शब्दांपेक्षा अधिक काही बोलून जातात, या संकल्पनेवर आधारित काही प्रसंग या जाहिरातीत गुंफण्यात आले आहेत. या जाहिरातीत काजल मस्ती, जिद्द आणि खोडसाळपणा अशा वेगवेगळ्या मूडमध्ये दिसणार आहे आणि या सगळ्या भावना ती फक्त तिच्या डोळ्यांतून दाखवणार आहे. १०० टक्के नैसर्गिक रंगांपासून बनलेल्या हिमालया काजळामुळे गहिर्‍या, काळ्याभोर झालेल्या काजलच्या डोळ्यांवर संपूर्ण जाहिरातीत भर देण्यात आला आहे. या काजळात बदामाचे तेल आणि दमास्क रोझसारख्या नैसर्गिक घटकांची वैशिष्ट्ये सामावलेली आहेत.

याबाबत बोलताना हिमालया ड्रग कंपनीच्या मार्केटिंगचे (कन्झ्युमर प्रोडक्ट विभाग) महाव्यवस्थापक रामराव धामिजा म्हणाले, ‘काजल अग्रवाल आमच्या उत्पादनातील मूळ वैशिष्ट्ये अतिशय सहज आणि तरीही दिमाखाने दर्शवते. त्यामुळे ती आमच्यासोबत असल्याचा आम्हाला फार आनंद आहे. या जाहिरातीतून आम्हाला जे खेळकर व्यक्तिमत्त्व दाखवायचे आहे त्याचे ती अगदी योग्य प्रतिबिंब आहे आणि आमच्या ब्रँडसाठी हे मूल्यवर्धकच आहे. वेगवेगळ्या प्रसंगांमधील तिच्या चेहर्‍यावरील भावांमधून आम्ही बोलक्या डोळ्यांची जी संकल्पना दाखवण्याचा प्रयत्न केलाय, त्यात ती भरच घालते.’

बोलक्या, गहिर्‍या डोळ्यांचे सौंदर्य बहाल करतानाच बदामाचे तेल आणि दमास्क रोझसारख्या नैसर्गिक घटकांतून पोषण आणि थंडावा मिळावा म्हणून खास तुमच्यासाठी तयार केलेले हे उत्पादन म्हणजे दैनंदिन अ‍ॅक्सेसरी आहे, यावर ही जाहिरात भर देते. हिमालया काजळाचे एक ग्रॅमचे युनिट ४५ रुपयांना, तर २.६ ग्रॅमचे युनिट १३५ रुपयांना अशा अतिशय परवडणार्‍या दरात उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search