Next
पटवर्धन हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २० जानेवारीला
BOI
Saturday, January 19, 2019 | 01:37 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सन १९७६ ते १९९० पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २० जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. सन १९९१ ते २००५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. हा मेळावा हायस्कूलच्या कै. भागोजीशेठ कीर सभागृहात होईल.

१० डिसेंबर २०१७ रोजी १९७५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला होता. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक (माजी विद्यार्थी) रत्नागिरी शहर, जिल्हा तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या अनेक लांबच्या शहरांतूनही उत्स्फूर्तपणे या मेळाव्यात सहभागी झाले होते. अशाच प्रकारचे मेळावे दर वर्षी माजी विद्यार्थी संघाने घ्यावेत, अशी त्यांनी सूचनाही केली होती. या निमित्ताने विविध क्षेत्रांत स्थिरावलेल्या माजी विद्यार्थ्यांचा परस्पर परिचय होऊ शकेल आणि त्यांच्या ज्ञानाचा लाभ शाळेच्या विद्यमान विद्यार्थ्यांना करून देता येईल.

माजी विद्यार्थी संघाच्या वतीने संस्थेच्या, विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजोपयोगी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत. विविध नोकरी, उद्योगधंदे, कृषी आरोग्य, सांस्कृतिक कला, क्रीडा, पर्यावरण अशा अनेक प्रकारचे उपक्रम व शिबिर घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, शाळेप्रती कृतज्ञता बाळगणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघामार्फत राष्ट्रपती पारितोषिकाने गौरविण्यात आलेल्या गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांचे स्मारक बांधण्याचे काम हाती घेतले आहे.

या शाळेची स्थापना सन १९०२ साली झाली असून, आजपर्यंत अनेक विद्यार्थी या शाळेने आणि पर्यायाने गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांनी घडविले आहेत. नंतरच्या काळात गुरुवर्य रा. पु. जोग, के. ठाकूरदेसाई, टिकेकर सर, दा. गो. जोशी अशा अनेक गुरुवर्यांनी असंख्य विद्यार्थी घडविले. भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलने आता महाविद्यालयापर्यंतची मजल मारली आहे.

या वेळी माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. दिलीप नागवेकर :
९४२११ ३७७६९
राजकीरण दळी : ९४२३२ ९२७२५
वसंत भणसारी : ९१६८२ ६८५७९
संतोष कुष्टे : ९४२३२ ९१८८१
दिलीप भाटकर : ९८२३१ २००८१
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search