Next
अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने मतदार जागृती कार्यक्रम
BOI
Monday, April 15, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने मतदार जागृतीसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर हे ‘१०० टक्के मतदानाची आवश्यकता’ आणि ‘नोटा अधिकाराबाबतची संभ्रमता’ या दोन विषयांवर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

‘बुधवार १७ एप्रिल, २०१९ रोजी एरंडवणे येथील भारती निवास सोसायटीतील भारती निवास हॉलमध्ये सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमासाठी भारती निवास सांस्कृतिक केंद्र, आपला परिसर यांचे सहकार्य लाभले आहे’, अशी माहिती अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. 

कार्यक्रमाविषयी :
मतदार जागृती - भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान 
स्थळ : भारती निवास सोसायटी हॉल, एरंडवणे.
दिवस व वेळ : बुधवार, १७ एप्रिल, संध्याकाळी सहा वाजता .
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search