Next
‘स्टार प्रवाह’वर ‘टीटीएमएम’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
BOI
Friday, June 29 | 03:16 PM
15 0 0
Share this story

मुंबई : प्रेम आणि लग्न या विषयाचे नवनवे कंगोरे चित्रपटांतून नेहमीच बघायला मिळतात. ‘टीटीएमएम- तुझं तू माझं मी’ या चित्रपटातूनही प्रेम आणि लग्न या विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट ‘स्टार प्रवाह’वर एक जुलैला रविवारी दुपारी एक आणि सायंकाळी सात  वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरद्वारे पहायला मिळणार आहे.

लग्न करायचे नाही असे ठरवून जय आणि राजश्री घरातून पळून जातात आणि योगायोगाने सहप्रवासी होतात. पुण्यातून सुरू झालेला प्रवास गोव्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि पुण्यात जाऊनच संपतो. या प्रवासादरम्यान त्या दोघांमध्ये काय घडते याचे मजेशीर चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. प्रेम, विवाहसंस्था, नातेसंबंध, कुटुंब यांवर हा चित्रपट तरुणाईच्या दृष्टीने भाष्य करतो.

नव्या दमाचे दिग्दर्शक कुलदीप जाधव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नेहा महाजन, ललित प्रभाकर, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, उदय टिकेकर, सविता प्रभुणे, पुष्कराज चिरपुटकर अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link