Next
सोनमची भूमिका निवड धाडसी असते अनिल कपूर
BOI
Wednesday, February 06, 2019 | 06:32 PM
15 0 0
Share this article:

सोनम कपूर आणि अनिल कपूर

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर-आहुजा तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या (एक फेब्रुवारी) ‘इक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक महत्त्वाचा ‘एलजीबीटीक्यू’सारखा सामाजिक विषय घेऊन येत आहे. यावर बोलताना सोनमचे वडील अभिनेते अनिल कपूर यांनी ‘सोनमची चित्रपटांची निवड नेहमीच धाडसी असते’, असे म्हटले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर पुन्हा एकदा आपली लाडकी कन्या सोनमचे कौतुक करताना दिसले. 

‘इक लडकी को देखा..’च्या निमित्ताने सोनम आणि वडील अनिल कपूर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसले आहेत. ‘सोनमची चित्रपट निवड धाडसी आहे. ‘नीरजा’ हा चित्रपट त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. या चित्रपटाने एक वेगळी जागा निर्माण केली. शिवाय सोनमलाही तिची एक वेगळी ओळख मिळाली. आता मला वाटतंय ‘इक लडकी को देखा...’च्या निमित्ताने सोनमला पुन्हा एक संधी मिळाली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. तिच्या खऱ्या आयुष्यातही ती खूप खरी आहे. मोठ्या प्रमाणात ती वाचन आणि विविध ठिकाणचे दौरे करते, त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तिला मिळतो. ‘इक लडकी को देखा..’मधली तिची भूमिकाही तिला अगदी साजेशी अशीच आहे. तिने ही भूमिका छान निभावली आहे. कलाकाराने आयुष्यात आव्हानं पेलली पाहिजेत, धाडसी बनलं पाहिजे आणि हे सगळं सोनम करताना मला दिसत आहे. याचा मला खूप आनंद आहे आणि सोनमचा अभिमानही आहे’, हे बोलत असताना अनिल कपूर यांच्या मनात आपल्या कन्येविषयी असलेला अभिमान दिसत होता. 

‘एलजीबीटीक्यू’सारखा महत्त्वाचा सामाजिक विषय घेऊन ‘इक लडकी को देखा...’ची कथा आपल्यासमोर आली आहे. नुकत्याच या विषयात झालेल्या न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट महत्त्वाचा ठरेल अशी आशा वाटते. विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट शेली चोप्रा यांनी दिग्दर्शित केला आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search