Next
डीएक्स आर्चरी अॅकॅडमीच्या बावधन शाखेचे उद्घाटन
BOI
Tuesday, November 06, 2018 | 05:49 PM
15 0 0
Share this story

अभय सातपुते, बाळासाहेब शेडगे, विजय राऊत, अॅड. प्रदीप कचरे

पुणे : नेमबाजी क्रीडाप्रकाराचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या ‘डीएक्स आर्चरी अॅकॅडमी’ची दुसरी शाखा बावधन येथे सुरू करण्यात आली आहे. तिचे उद्घाटन नुकतेच नगरसेविका अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

या वेळी युवा नेते अभय सातपुते, भूगावचे माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, समता परिषदेच्या मुळशी तालुका शाखेचे अध्यक्ष विजय राऊत, अॅड. प्रदीप कचरे, सचिन इंदलकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘खेलो इंडिया’ अभियानाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही प्रशिक्षण संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेचे प्रमुख सुजितकुमार कांडगिरे असून, त्यांनी १९ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन नऊ पदके मिळवली आहेत. ते या प्रभागातील होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. डीएक्स आर्चरी अॅकॅडमीमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेले खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vijay About 137 Days ago
Nice
0
0
Jivan About 137 Days ago
👌
1
0

Select Language
Share Link