Next
आगाशे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लुटला विमाने उडविण्याचा आनंद
BOI
Friday, March 01, 2019 | 05:26 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
भारताने दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या हवाई हल्ल्याची प्रेरणा घेऊन रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कागदापासून विमाने बनवली. विमान उडते कसे, ते कसे बनवले जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. 

विद्यार्थ्यांना वेगळ्या विषयाची माहिती मिळावी, ती धाडसी बनावीत, यासाठी हा उपक्रम शाळेत राबवण्यात आला. जंबो जेट विमानाची प्रतिकृती तयार करण्याची कल्पना मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम व शिक्षक सुधीर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यापूर्वी विमानाची माहिती, कार्य यांबद्दल विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी ही विमाने अर्ध्या तासात तयार केली. मुलांनी याचा आनंद लुटला.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दिवाकर About 172 Days ago
आगाशे विद्यामंदिरचा छान उपक्रम, खरे तर सैनिकी शिक्षण शालेय जीवनापासूनच मिळाले पाहिजे. तरच मुलांच्या अंगी शिस्त पाहायला मिळू शकते.
0
0

Select Language
Share Link
 
Search