Next
‘यशोदा’मध्ये पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंगसाठी मोफत प्रवेश
प्रेस रिलीज
Thursday, June 29, 2017 | 12:58 PM
15 0 0
Share this article:

सातारा:  येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि डिग्रीसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना, तसेच आर्थिक क्षमता नसलेल्या मात्र शिकण्याची उमेद असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, यशोदा टेक्निकल कॅम्पसने मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे यांनी ही माहिती दिली.

‘यशोदा टेक्निकल कॅम्पस हा सर्व सोयींनी युक्त कॅम्पस आहे; मात्र दुष्काळाची स्थिती आणि आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वांनाच मदत करण्याच्या उद्देशाने यशोदा इंजिनीअरिंग कॉलेजने हा निर्णय घेतला आहे. या कॉलेजमधील पॉलिटेक्निक आणि डिग्री इंजिनीअरिंगच्या सर्व जागा मोफत भरल्या जाणार आहेत. त्याबरोबरच पुढील चार वर्षांचे शिक्षणही प्रेसिडेन्शियल स्कॉलरशिपअंतर्गत मोफत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ही सवलत सलग चार वर्षे राहणार आहे. त्यामुळे शिकण्याची इच्छा आणि तळमळ असलेल्या सर्वांना या योजनेचा फायदा घेता येईल,’ असे प्राध्यापक सगरे यांनी सांगितले.

‘केवळ इंजिनीअरिंगच नाही, तर कॅम्पसमधील ‘एमसीए’ आणि ‘एमबीए’ या अभ्यासक्रमांनाही मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. जवळपास राहणाऱ्या मुलांसाठी बसेसची सुविधा, बाहेरगावच्या मुलींसाठी होस्टेलची सुविधा, वायफाय कॅम्पस, सर्व अत्याधुनिक सुविधा, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र जिम, २४ तास खुली असलेली स्टडी रूम, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन अशा सोयीदेखील या कॅम्पसमध्ये दिल्या जातात. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. डिग्रीसाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स आणि सिव्हिल या अभ्यासक्रमांना प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळू शकतो. डिप्लोमासाठी मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
प्रवेश संख्या मर्यादित असल्यामुळे पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल, असे प्राध्यापक सगरे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search