Next
‘ग्रामीण भागाच्या विकासासाठी हेमंत पाटील यांना निवडून द्या’
नागेश शिंदे
Tuesday, April 09, 2019 | 11:13 AM
15 0 0
Share this article:हिमायतनगर :
भाजप-शिवसेना महायुतीचे हिंगोली मतदारसंघाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सरसम जिल्हा परिषद गटात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. ‘ग्रामीण भागाच्या विकासासाठी हेमंत पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या,’ असे आवाहन त्यांनी केले.हिमायतनगर भेटीदरम्यान त्यांनी ग्रामीण भागातील पुरुष व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर भाजप महिला आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या हिमायतनगर, सरसम येथील छोटेखानी बैठकांमध्ये राजश्री पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. हेमंत पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असून, त्यांच्या प्रचारार्थ भाजप आघाडीचे कार्यकर्ते एकदिलाने मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे. या दौऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, भाजपचे जिल्हा चिटणीस सुधाकर पाटील, नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुका संघटक संजय काइतवाड, विलास वानखेडे, यल्लप्पा गुंडेवार, विशाल राठोड, योगेश चिल्कावार, बंडूभाऊ अनगुलवार, खंडू चव्हााण, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शिवसेनेचे विधानसभा संघटक विजय वळसे, सत्यव्रत ढोले, रामचंद्र पाटील, राजू पाटील-शेलोडेकर, किशनराव वानखेडे, प्रकाश जाधव, अरविंद पाटील सिरपल्लीकर, पवन करेवाड सिरंजनीकर, रवी पाटील टेंभीकर, सूरज दासेवार, संतोष पाटील, योगेश पवार, रवींद्र दमकोंद्वार, साईनाथ धोबे, आनंद कदम, मधुकर पांचाळ, ज्योती देशमुख, ज्योती बेदरकर, सुनंदा दासेवार, कौशल्याबाई, गौरव सूर्यवंशी, मंडलवाड, दमकोंडवार, मोतेवार, बालू ढोणे, गजानन पिंपळे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला आघडीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search