Next
चला! एक झाड दत्तक घेऊ या ..
वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा अभिनव उपक्रम
BOI
Wednesday, July 03, 2019 | 05:01 PM
15 0 0
Share this article:


अहमदनगर : ‘झाडे लावा, झाडे जगवा, असे प्रचार करत उत्साहाने वृक्षारोपण मोहीम राबवली जाते;पण नंतर ती झाडे जगली की मेली, हेदेखील बघितले जात नाही. पर्यावरण वाचवण्यासाठी नुसती झाडे लावून उपयोग नाही, तर ती जगवली पाहिजेत. याच उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण गावातील वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने झाडे दत्तक देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 

यामध्ये वड, पिंपळ,  कडुनिंब, कदंब, चिंच अशी देशी झाडे लावण्यात येणार असून, कोणतीही संस्था किंवा व्यक्ती आपल्या आवडीचे एक झाड दत्तक घेऊ शकतील. त्यानंतर संस्था हे झाड योग्य ठिकाणी लावून, त्याचे संवर्धन, जतन करेल. साधारणपणे पाच ते सहा फूट उंचीचे एक झाड असेल. त्याला संरक्षक जाळी,  वेळेवर पाणी व खत देण्याची जबाबदारी संस्था घेणार आहे. 


त्या झाडावर आपल्या नावाची किंवा ज्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ हे झाड दत्तक घेण्यात आले आहे, त्याच्या नावाची पाटी लावली जाईल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी साधारणपणे एका वृक्षाचा खर्च पाचशे रुपये इतका आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या कामात हातभार लावावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. 

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क :
सागर बनकर : ९५५२४ ६७९७९   
सुधीर ढवळे : ९८२२२ २५६९३ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Wagh Sir About 103 Days ago
What an excellent job!
1
0

Select Language
Share Link
 
Search