Next
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात रक्तदान शिबीर
BOI
Friday, September 14 | 05:23 PM
15 0 0
Share this story

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी विद्यार्थी व  प्राध्यापकवर्ग
पुणे : शिकागोमधील धर्म संसदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या १२५ व्या वर्धापनदिनानिमित्त टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचा संगणक शास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकतेच महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ३५ विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. सलग २२ व्या वर्षी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. आशुतोष काळे व संतोष नखाते यांनी रक्तदान आणि चांगल्या आरोग्याच्या सवयींविषयी विद्यार्थांना मार्गदर्शन  केले. 

रक्तदान शिबिराप्रसंगी प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र लेले, शिरीष नाईकरे, प्रा. सत्याप्पा कोळी आदी
प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी,  संस्थेचे सहचिटणीस शिरीष नाईकरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुचेता दळवी, प्रा. रुपाली अवचरे, प्रा. सत्याप्पा कोळी, डॉ. शीतल रणधीर, प्रा. अनघा देशमुख, प्रा. योगिता झोपे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र लेले व अन्य प्राध्यापक या वेळी उपस्थित होते. डॉ. अर्जुन मुसमाडे, प्रा. दत्तहरि  मुपाडे,  आनंद नाईक यांनी शिबीर व्यवस्था चोख ठेवण्यासाठी मदत केली. संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विलास पंगुडवाले,  चिटणीस आनंद छाजेड  यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link